उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई 

 

जुगार विरोधी कारवाई दरम्यान पोलीसांनी दि. 13.05.2022 रोजी पुढील प्रमाणे छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात पुढील प्रमाणे गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद - अजिंक्य आडसुळ, ऋषीकेश शिंदे हे दोघे पाथ्रुड गल्ली, उस्मानाबाद येथे चक्री मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्यासह रक्कम असा एकुण 1,15,500 ₹ बाळगलेले आढळले. तर नितीन एकनाथ पोतदार यांसह 3 पुरुष हे उस्मानाबाद मार्केट यार्ड परिसरात ऑनलाईन विन गेम जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 1,35,480 ₹ बाळगलेले आढळले. तर ललित नेताजी पवार यांसह तीघे हे मार्केट यार्ड परिसरात मटका जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 25,700 ₹ बाळगलेले आढळले. तर दत्ता मुदे यांसह चौघे पाथ्रुड गल्ली परिसरात ऑनलाईन मटका जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 71,625 ₹ बाळगलेले आढळले. सरफराज मुजावर यांसह सात पुरुष जनता बँकेसमोर ऑनलाईन वनप्लस मटका जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 62,000 ₹ बाळगलेले आढळले.

उस्मानाबाद -  निलेश चपने यांसह 5 पुरुष हे ऑनलाईन वनप्लस मटका साहित्यासह रक्कम असा एकुण 59,280 ₹ बाळगलेले आढळले. गणेश गाडे यांसह दहा पुरुष ऑनलाईन मटका जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 1,08,540 ₹ बाळगलेले आढळले. जमीन तांबोळी यांसह चार पुरुष हे तुळजाभवानी संकुलासमोरील पत्रा शेडसमोर मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 23,190 ₹ बाळगलेले आढळले.

कळंब - दिलीप शिवमुर्ती व हरुन शेख, सुधीर कदम व महादेव पेठे, शंकर सावंत हे तीन वेगवेगळ्या ठिकाणी मटका जुगार चालवण्याचे साहित्यासह रक्कम असा एकुण 44,110 ₹ बाळगलेले आढळले.

वाशी - सिकंदर शेख हे पारगाव येथे मटका जुगार साहित्यासह 360 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

परंडा - समीर अरब हे समतानगर, परंडा येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह रक्कम असा एकुण 14,250 ₹ बाळगलेले आढळले.

येरमाळा - शिवराम ईटकर हे येडेश्वरी कमानीजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,120 ₹ बाळगलेले आढळले.