उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विक्री विरुध्द कारवाई 

 

उस्मानाबाद  - अवैध मद्य विक्री विरुध्द उस्मानाबाद पोलीसांनी दि. 14.05.2022 रोजी जिल्हाभरात 12 ठिकाणी छापे मारले. छाप्यातील अवैध मद्य जप्त करुन 12 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात खालील प्रमाणे 12 गुन्हे नोंदवले आहेत.

1) भूम पो.ठा. च्या पथकास चिंचोली ग्रामस्थ- पोपट वारे हे भद्रा कॉम्पलेक्स, भुय येथे 14 बाटल्या देशी दारु बाळगलेले, तर त्याय कॉम्प्लॅक्सच्या आडोशाला पारधीपिढी, भुम येथील मंगलबाई काळे या 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या आढळल्या.

2) स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकास भुम येथील दिपक मुळे हे पन्हाळवाडी शिवारातील  सुमितराजे हॉटेलमध्ये 2,20,500 ₹ किंमतीचे विदेशी मद्य अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले तर  सोनेगाव गा्रमस्थ- कल्पेश घोडके हे गडदेवदरी शिवारातील गडपाटी येथे अवैध विक्रीच्या उद्देशाने 65,200 ₹ किंमतीचे देशी- विदेशी मद्य बाळगलेले तर जामगाव ग्रामस्थ- विक्रम झिरपे हे परंडा येथील करमाळा रस्त्यालगत कएा हॉटेलसमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने 4,260 ₹ किंमतीचे देशी- विदेशी मद्य बाळगलेले आढळले.

3) परंडा पो.ठा. च्या पथकास खासापुरी नाका, परंडा ग्रामस्थ- ज्योती पवार या आपल्या घरासमोर 35 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर ईडा ग्रामस्थ- सुदामती चव्हाण या गाव शिवारात 26 बाटल्या देशी दारु बाळगलेल्या आढळल्या.

4) वाशी पो.ठा. च्या पथकास आंद्रुड ग्रामस्थ- बाबासाहेब गिते हे आपल्या घरासमोर 1,386 ₹ किंमतीचे देशी- विदेशी मद्य बाळगलेले आढळले.

5) अंबी पो.ठा. च्या पथकास उंडेगाव, ता. परंडा ग्रामस्थ- सर्जेराव डुकळे हे गावातील एका समाज मंदिरामागे 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर सोनारी ग्रामस्थ- सुनिल गर्जे हे गाव शिवारात 48 बाटल्या देशी दारु बाळगलेले आढळले.

6) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास पारधी पिढी, साठेनगर येथील अनिल काळे हे राहत्या परिसरात 26 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर इंदीरानगर येथे आणा वाटाडे हे 24 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.