उस्मानाबादसह सोलापूर येथील चोरीच्या मालासह आरोपी ताब्यात

 

बेंबळी  : चिखली , ता.जि.उस्मानाबाद येथील संभाजी शिवाजी सुरवसे हे दि. 01.06.2022 रोजी रात्रौ आपल्या घरात झोपलेले असताना अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीस असलेली खिडकी उघडुन घरात प्रवेश करुन त्यांचे लोखंडी कपाटातील सुवर्ण दागिने व 1,80,000 ₹ रोख रक्कम असा एकुण 2,55,000 ₹ किंचा माल घरफोडी करुन चोरुन आहे. यावरुन संभाजी शिवाजी सुरवसे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी व उस्मानाबाद विभागाचे .पोलीस उप अधीक्षक कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ-नवनाथ बांगर, पोना- रविकांत जगताप, सुनिल इगवे, पोकॉ- विनायक तांबे, सचिन कोळी यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे-अक्षय बाळु शिंदे, वय 25 वर्षे, रा. सुंभा, ता.जि.उस्मानाबाद यास काल दि. 28 जून रोजी कोंड, ता.जि.उस्मानाबाद येथुन ताब्यात घेउन वरील नमूद गुन्ह्याच्या अनुशंगाने कसून व कौशल्यपुर्ण तपास केला. यात त्याने गुन्हा केल्याची कबुली देउन त्याच्याकडून गुन्ह्यातील 10 ग्रॅम सुवर्ण दागिने तसेच होंडा युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकलीही जप्त केली. या मोटारसायकलीच्या इंजन व सांगाडा क्रमांकाच्या आधारे माहिती घेतली आसता सदर मोटारसायकल ता.बार्शी जि.सोलापुर येथुन चोरीस गेल्यावरुन तेथील वैराग पो.ठा. येथे गुन्हा क्र. 301/ 2021 भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा दाखल आहेत. सदर प्रकरणी सोलापुर जिल्ह्यातील नमूद पोलीस ठाण्यास कळवले असुन पुढिल अधिक तपास करीत आहेत. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)

 ऑपरेशन मुस्कान अंतर्गत बालकास दिले पालकांच्या ताब्यात

उमरगा :18 वर्षाखालील हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेवुन त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत व नातेवाईकांपर्यंत सोपविण्यासाठी पोलीसांकडुन ऑपरेशन मुस्कान राबविले जात आहे. दि.28.06.2022 रोजी 20.00 वा चे सुमारास उमरगा पोलीस ठाणे हददीतील जकेकुर चौरस्ता येथे एक अंदाजे 12 वर्षाचा मुलगा घाबरलेल्या अवस्थेत इकडे तिकडे फिरत असताना उमरगा पोलीसांना मिळुन आला. त्यास ऑपरेशन मुस्कान अंतर्गत पोलीस ठाणेत आणुन विचारपुस करता त्यास बोलता व लिहता येत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सदर बालकाची माहिती प्राप्त्‍ करण्याचे उददेशाने त्याचे छायाचित्र वेगवेगळया व्हॉटसअप ग्रुप मध्ये पोलीसांनी प्रसारित केले. सदर बालका सोबत संवाद साधण्यासाठी निवासी मुकबधीर शाळा, उमरगा येथील शिक्षक श्री. विलास भिमराव अस्वले यांना उमरगा पोलीस ठाणेत बोलविण्यात आले असता त्यांनी सदर बालकास ओळखुन बालक हा त्यांचेच शाळेचा विदयार्थी असुन त्याचे नाव दिपक कालु चव्हाण, वय 13 वर्षे , रा. शास्त्री नगर तांडा, दाळिंब, ता.उमरगा असे असल्याचे सांगुन तो दि.28.06.2022 रोजी सायंकाळी कोणालाही काही एक न सांगता शाळेतुन निघुन गेल्याचे कळविले. त्यांनतर पोलीसांनी बालकाच्या आई-वडिलांस संपर्क साधुन त्याचे ताब्यात देण्यात आले आहे. 

      सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व उमरगा पेालीस ठाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ-घोळसगाव, पोना-जाधव, पोकॉ-कांबळे यांनी केली आहे