उस्मानाबादेत अनैतिक देह व्यापार करणा-या हॉटेलवर छापा

 

उस्मानाबाद - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 16.09.2022 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद शहरात आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, उस्मानाबाद ते तुळजापूर रस्त्यालगत ‘हॉटेल सरिता’ चे चालक आपल्या हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. 

यावर पथकाने बनावट ग्राहकास तेथे पाठवून   बातमीची खात्री करुन 19.45 वा. सु. ‘हॉटेल सरिता’ येथे छापा टाकला असता हॉटेलच्या पाठीमागील खोल्यांमध्ये 4 प्रौढ मिहिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक एक 49 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) असुन ती त्या 4 महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करुन त्यांच्यावरती उपजिवीका करीत असल्याचे समजले. यावर पथकाने त्या हॉटेल चालक महिलेस अटक करुन तीच्या ताब्यातील एक मोबाईल फोन व 4,500 ₹ रोख रक्कम असा माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या 4 महिलांची सुटका करुन हॉटेल चालक महिलेसह हॉटेल मालक या दोघांविरुध्द उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 287 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 370, 370 अ (2) सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4 , 5 अंतर्गत नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक  एम. रमेश, पोनि- . के.एस. पटेल, श्री. उस्मान शेख, पोउपनि- श्री. चाटे, सपोफौ- कऱ्हाळे, महिला पोहेकॉ- पुरी, पोना- सांगळे, राऊत, शेख, महिला पोना- जाधव, पोकॉ- अंभुरे, खांडेकर, साळुंके, जमादार, पाडे यांच्या पथकाने केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास ‘अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष’ (ए.एच.टी. सेल) चे प्रभारी पोनि- श्री. के.एस. पटेल हे करत आहेत.