पुण्यातील व्यक्तीचा तुळजापुरात मृत्यू 

नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे तुळजापूर पोलिस ठाण्याचे आवाहन
 

उस्मानाबाद -  पुणे जिल्ह्यातील चिखली येथील प्रमोद अंकुश राजगुरु, वय वर्षे 18 हा तरुण तुळजापूर येथे फिरत असतांना चक्कर येऊन पडल्याने त्यास तेथील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात दि.08 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 08.30 वाजण्याच्या सुमारास औषधोपचाराकरिता दाखल केले. त्यानंतर तुळजापूर येथील डॉक्टरांनी त्यास उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचाराकरिता पाठविले होते. उस्मानाबाद येथे औषधोपचार चालू असतांना दि.19 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 07.15 वाजता तो मयत झाला आहे.

मयत इसमाच्या अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट ज्यावर पिवळ्या रंगातील INDIA असे इंग्रजी नांव असलेले तसेच छातीवर डाव्या बाजूला पांढरा रंगात गोल डिझाईन आहे आणि काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. रंग गोरा, उंची 165 से.मी. (पाच फूट), केस काळे, चेहरा गोल, शरीर बांधा सडपातळ असे या मयत इसमाचे वर्णन आहे.

तरी या मयत इसमाच्या नातेवाईकांनी लवकरात लवकर पोलिस ठाणे तुळजापूर (02471-242028), 8830078730, पोलिस निरीक्षक श्री.काशीद (8668630323) येथे संपर्क साधावा, असे आवाहन तुळजापूर पोलिस ठाण्याचे डी.एस.लाटे यांनी केले आहे.