ढोकी पोलीस ठाणे आवारात गोंधळ घालणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

 

 ढोकी  : तडवळा (कसबे), ता. उस्मानाबाद येथील- विजय बबन सोनटक्के, वय 45 वर्षे यांनी दि. 20.10.2022 रोजी 10.00 वा. सु. मद्यधुंद अवस्थेत  ढोकी पोलीस ठाण्याच्या आवारात येउन आरडाओरड करुन सार्वजनिक शांतता भंग केली. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 85 (1) अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 विनयभंग

 
उस्मानाबाद  : एका गावातील एक 17 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 19.10.2022 रोजी 18.30 वा. सु. घराजवळील शेतात शौचास गेली असता गावातीलच दोन तरुणांनी तीचा पाठलाग करुन तीच्याकडे लैंगीक अनुग्रह केला. यावेळी त्या मुलीने त्यांना विरोध केला असता त्या दोघांनी तीच्यासोबत झोंबाझोंबी करुन तीला कंबर पट्ट्याने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 20.10.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 354 (अ), 354 (ड), 323, 506, 34 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 आणि ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.