कळंब पोलीस ठाण्याच्या आवारात भांडणे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

कळंब  : दिगंबर रामेश्वर फरताडे, रा. ईटकुर व राजेश शंकर शेळवणे, रा. कळंब हे दोघे दि. 11 जून रोजी 23.30 वा. सु. पोलीस ठाणे कळंब येथे परस्परविरोधी तक्रार देण्यास आलेले होते. यावेळी पोलीस त्यांची तक्रार घेत असताना नमूद दोघांनी एकमेकांना शिवीगाळ करुन आरडाओरड करुन सार्वजनिक शांतता भंग केली. यावरुन कळंब पो.ठा. चे पोहेकॉ- सुनिल हांगे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 160 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


शेतीच्या वादावरून हाणामारी 

कळंब  : नंबर बांध नांगरताना हटकल्याच्या कारणावरुन ईटकुर, ता. कळंब येथील अक्षय दत्तात्रय फरताडे, दत्ता रामेश्वर फरताडे यांनी दि. 11 जून रोजी 20.30 वा. सु. भाऊबंद- दिगंबर रामेश्वर फरताडे यांना त्यांच्या गट क्र. 1291 मधील शेतात शिवीगाळ करुन दगडाने, काठीने मारहान करुन दिगंबर यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दिगंबर फरताडे यांनी दि. 12 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.