रहदारीस धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

 

मुरुम  : केसरजवळगा, ता. उमरगा येथील मल्लिकार्जुन टंक्केवार यांनी दि. 08.02.2022 रोजी 13.00 वा.सु. मुरुम येथील चौकात आपल्या ताब्यातील कमांडर जिप क्र. एम.एच. 24 सी 1348 ही रहदारिस धोकादायकपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्याविरुध्द मुरुम पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

वाशी : हातोला, ता. वाशी येथील संजय सोपान जोगदंड, वय 55 वर्षे यांसोबत लक्ष्मण नन्नवरे, वय 40 वर्षे हे दि. 05.02.2022 रोजी 20.00 वा. सु.बोरी फाटा येथील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एव्ही 2937 ही चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवून संजय जोगदंड चालवत असलेल्या मो.सा. ला धडकली. या अपघातात संजय जोगदंड हे मयत झाले तर लक्ष्मण नन्नवरे हे गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अक्षय संजय जागदंड यांनी दि. 08 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.