काक्रंबामध्ये ५० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या 

 

तुळजापूर : काक्रंबा, ता. तुळजापूर ग्रामस्थ- निवृत्ती जनार्धन सुरवसे, वय 50 वर्षे यांनी दि. 04.11.2021 रोजी 01.00 ते 06.00 वा. दरम्यान गावकरीच्या शेतातील झाडास गळफास घेउन आत्महत्या केली.

 शेतातील भाजीपल्यात जनावरे चारल्याच्या कारणावरुन गावकरी- अमित महादेव घोगरे व सुवर्णा घोगरे यांनी निवृत्ती यांना मारहान करुन अपमानीत केले होते. या त्रासातून निवृत्ती सुरवसे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या नलीनी निवृत्ती सुरवसे यांनी दि. 08.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरीचे दोन गुन्हे दाखल 

परंडा : वारदवाडी फाटा येथील ‘परशुराम पेट्रोलियम विक्री केंद्राच्या भुमीगत डिझेल टाकीच्या डिपरॉड पाईमचे झाकन दि. 06- 07.01.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने काढून टाकीत नळी सोडून त्याद्वारे 1,02,290 ₹ किंमतीचे 1,098 लि. डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या पेट्रोल पंप व्यवस्थापक- मनोज कुंडलीक अंधारे यांनी दि. 08 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 येरमाळा  : चोराखळी येथील धारशिव साखर कारखाना परिसरातून महिंद्रा कंपनीचा एक लाल रंगाचा ट्रॅक्टर एम.एच. 25 एच 4731 हा दि. 07- 08.01.2022 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या नमूद ट्रॅक्टर चालक- अमोल शंकर गालफाडे, रा. सफेपुर, ता. बीड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

फसवणूक 

मुरुम : भोसगा, ता. लोहारा ग्रामस्थ- दत्ता रामराव पांचाळ हे दि. 12.12.2021 रोजी 14.45 वा. सु. दाळींब, ता. उमरगा येथील एटीएम केंद्रामध्ये डेबिट कार्डद्वारे पैसे काढत होते. यावेळी त्यांना पैसे काढण्यास एका पुरुषांने मदतीचा बहाना करुन पांचाळ यांचा गोपनीय पासवर्डही बघून घेतला व त्यांचे डेबिटकार्ड घेउन त्यांना त्याच रंगसंगतीचे दुसरे डेबिट कार्ड दिले. यानंतर काही कालावधीनंतर चव्हाण यांना त्यांच्या बँक खात्यातून एकुण 1,38,553 ₹ रक्कम कपातीचे बँकेचे लघु संदेश प्राप्‍त झाले. अशा मजकुराच्या दत्ता पांचाळ यांनी दि. 08 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.