तेरणा नागरी बँकेत २९ लाखाचा अपहार

 

धाराशिव  : तेरणा नागरी सहकारी बॅक शाखा, उस्मानाबाद येथील- मुख्य  कार्यकारी अधिकारी- कल्याण संदीपान पवार, तात्कालीन लिपीक, राहुल रामचंद्र जेटीथोर, तात्कालीन आयटी कॉपरेटर अविनाश भिमराव चव्हाण या तिघांनी दि. 26.04.2021  रोजी 11.00 ते दि. 31.03.2022 रोजी 18.30 वा. सु. संगणमत करुन तेरणा नागरी सहकारी बॅक शाखा, उस्मानाबाद येथील 29,07,963 ₹ रक्कमेचा अपहार करुन व्हाउचर गायब करुन बॅकेंची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या तेरणा नागरी सहकारी बॅक शाखा, उस्मानाबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी- किसन विश्वंभर मोटे यांनी दि. 06.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अंगणात पाणी टाकण्याच्या कारणावरून मारहाण

चिलवडी, ता. उस्मानाबाद येथील- ललीत दिंडोळे, पुजा दिंडोळे, डिगंबर दिंडोळे,आण्णासाहेब दिंडोळे,अन्य 1 अंगणात पाणी टाकण्याच्या कारणावरून दि.05.06.2023 रोजी 07.30 वा.सु. चिलवडी येथे गावकरी- फुलचंद नामदेव दिंडोळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने, लोखंडी रॉडने मारहान करत असताना त्यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या पत्नी यांना शिवीगाळ केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फुलचंद दिंडोळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दि. 06.06.2023 रोजी नोंदवला आहे.

 अपघातात एक ठार 

ढोकी  : साळे गल्ली, शहावली मोहल्ला, लातुर येथील- महेबुब रसुलसाब बागवान, वय 61 वर्षे, हे दि.04.06.2023 रोजी दुपारी 20.45 वा. सु. ढोकी  ते तडवाळा जाणाऱ्या रोडवर महिंन्द्रा सुप्रो क्र एमएच 24 एयु 1524 ने जात होते. दरम्यान बस क्र क्र एम एच 14 बीटी 2189 चा चालक नामे पुंडलीक नारायाण कवठेकर, रा. निलंगा, जि. लातुर यांनी त्यांचे ताब्यातील बस ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून महिंन्द्रा सुप्रोला समोरुन धडक दिली. या आपघातात महेबुब हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या वसीम महेबुब बागवान रा. साळे गल्ली, शहावली मोहल्ला, लातुर यांनी दि.06.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह कलम 184 मो. वा. का.  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.