कोरोनाविरूद्धची लढाई जिंकण्यास ट्रम्प यांचा जावई गुप्तखात्याच्या पदावर

 



कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजलाय आणि मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. अमेरिकेची देखील या धोकादायक कोरोना विषाणूच्या समोर असहाय्यता दिसत आहे. अध्यक्ष ट्रम्प यांचे जावई आणि इव्हांका ट्रम्प यांचे पती जारेड कुशनर सध्या कोरोनाला संपवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. सध्याच्या कठीण काळात अमेरिकेसाठी जारेड कुशनर महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

परंतु ही मोठी जबाबदारी कुशनर यांना दिल्याबद्दल बरीच टीका देखील होत आहे. बर्‍याच समीक्षकांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूला फारसे गांभीर्याने घेऊ नये असा सल्ला कुशनर यांनी ट्रम्प यांना दिला होता. अशा परिस्थितीत कुशनर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका रिपोर्टनुसार जारेड कुशनर सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अमेरिकेचे फेडरल सरकार सर्व राज्यांना पुरवत असलेल्या आपत्कालीन सेवा कुशनेर यांच्याच देखरेखीखाली चालू आहेत.

कुशनर हे संपूर्ण ऑपरेशन एका गुप्त कार्यालयाच्या माध्यमातून करीत आहे. त्यांच्यासाठी एक खास पोस्ट तयार करण्यात आले असून त्यांच्या टीमचे नाव स्लिम सूट क्राऊड असे आहे.
कुशनर यांनी चीनला आपल्या देशासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे पुरविण्याचे काम केले आहे. जारेड कुशनर यांनी आपल्या कामासाठी अमेरिकेच्या अव्वल आरोग्य तज्ञाची निवड केली आहे. जारेडच्या टीममध्ये देशातील संसर्गजन्य रोगांचे सर्वात मोठे विशेतज्ज्ञ मानले जाणारे डॉ एंथनी फॉकी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अव्वल तज्ज्ञ डॉ. डेबोरा बर्क देखील या टीमचे सदस्य आहेत.

बर्‍याच समीक्षकांचा असा आरोप आहे की जारेड कुशनर हेच होते ज्यांच्या सल्ल्यानुसार ट्रम्प यांनी सुरुवातीला कोरोना विषाणू बाबतीत जसा घ्यावा तितका गांभीर्याने विचार केलेला नव्हता आणि आता परिस्थिती बिकट झाल्यावर आणीबाणीची वेळ आल्यावर    जेरेड कुशनर जबाबदारी संभाळायचे दाखवत आहेत.   जर राज्यपालांना केंद्र सरकारची मदत हवी असेल तर त्यांना आधी कुशनर यांना सांगावे लागत आहे, त्यांना प्रथम फोन करणे भाग पडत आहे.

इव्हांका ट्रम्प यांचे पती जारेड कुशनर म्हणाले की, ज्यांना त्यांच्या राज्यात काय आवश्यक आहे, कशाची किती आवश्यकता आहे हे माहित नसते ते लोक आपल्यावर टीका करीत आहेत ,  खरेतर सरकारला राज्यांना मदत करायची आहेच पण आधी त्यांच्याकडे योग्य डेटादेखील उपलब्ध दिसत नाहीये.