अमाहाकडून ३ मानसिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन

~ दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश ~
 

मुंबई, - मानसिक आरोग्य समस्या असलेल्या प्रत्येकासाठी दर्जेदार मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा अमाहाचा उद्देश आहे. डिजिटली ४.५ दशलक्ष व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव टाकल्यानंतर अमाहाकडून दिल्ली एनसीआर, मुंबई व बेंगळुरू येथे ३ मानसिक आरोग्य केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले आहे. २०१६ मध्ये प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ व आरोग्यसेवा उद्योजक डॉ. अमित मलिक यांनी अमाहाची (पूर्वीची इनरअवर) स्थापना केली. २०१९ मध्ये, सामाजिक उद्योजक व जागतिक मानसिक आरोग्य अॅम्बेसेडर नेहा किरपाल त्यांच्यासोबत सह-संस्थापक म्हणून सामील झाल्या.

गेल्या सात वर्षांमध्ये अमाहा भारतातील सर्वात मोठी व सर्वात प्रतिष्ठित मानसिक आरोग्य संस्था म्हणून उदयास आली आहे, जी समस्येने ग्रस्त लोकांना जलद व सुलभ उपलब्धतेसाठी वैद्यकीय कौशल्य, जागतिक सर्वोत्तम पद्धती व तंत्रज्ञान-आधारित पाठिंबा देत आहे. गेल्या एका वर्षात अमाहाच्या ११० मानसोपचारतज्ञ व मानसशास्त्रज्ञांच्या टीमने ३०० हून अधिक भारतीय शहरांमधील व्यक्तींना १५ हून अधिक भाषांमध्ये ऑनलाइन ३५,००० हून अधिक थेरपी व मानसोपचार सत्रे दिली आहेत आणि बेंगळुरू, दिल्ली एनसीआर व मुंबईमध्ये पहिली तीन वैयक्तिक केंद्रे देखील स्थापन केली.

अमाहा डिजिटल अॅपने लवकर हस्तक्षेपासाठी मोफत सेल्फ-केअर टूल्स व प्रोग्राम्स, माहितीपूर्ण कन्टेन्ट व मूल्यांकनांसह जागतिक स्तरावर ४.५ दशलक्षांहून अधिक व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. संस्था २०,००० हून अधिक सदस्यांच्या समुदायाला ऑनलाइन सपोर्ट देखील देते.

अमाहाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित मलिक म्हणाले, ‘‘माझा विश्वास आहे की, भारतासारख्या मोठ्या व कमी सेवा असलेल्या देशात, उच्च दर्जाच्या मानसिक आरोग्य सेवा लवकर उपलब्ध करून देणे हे गुणकारी व दीर्घकालीन रिकव्‍हरीसाठी महत्त्वाचे आहे, ज्यामुळे लोकांना खरोखर बरे वाटू शकेल, त्यांची स्थिती उत्तम होण्यासोबत ते उत्तम जीवन जगू शकतील. अमाहामध्ये आमचा भारतभरातील आमच्या सर्व केंद्रांमध्ये विश्वसनीय मानसिक आरोग्यसेवा, तसेच वर्षातील ३६५ दिवस पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत ऑनलाइन सेवा देण्याचा मनसुबा आहे. जगाच्या मानसिक आरोग्याचा एक तृतीयांश भार भारतावर असल्यामुळे अमाहा उच्च दर्जाच्या शाश्वत आणि स्‍केलेबल ऑफर तयार करण्याच्या मोहिमेवर आहे.’’ 

अमाहाचा थेरपी सत्रे, मनोरुग्ण काळजी, सेल्फ-केअर टूल्स आणि व्यक्ती, कुटुंबं व कामाच्या ठिकाणी सामुदायिक समर्थन यांच्या संयोजनाद्वारे संपूर्ण आयुष्यभर एकात्मिक उपचार व केअर सुविधा प्रदान करण्यासाठी एकाच छत्राखाली संस्था निर्माण करण्याचा मनसुबा आहे. कार्यस्थळे व महाविद्यालयांसाठी अमाहाच्या इमोशनल वेल-बिंग प्रोग्राममध्ये सध्या देशभरातील ७,००,००० पेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश आहे, तसेच चिल्ड्रेन फर्स्टसोबत सहयोगाने ते शाळा व महाविद्यालयांसाठी पुढील क्लिनिकल सहाय्य आणि प्रशिक्षण देखील देत आहेत.