कोरोना लसीसाठी आपल्याला किती पैसे खर्च करावे लागतील ?

जाणून घ्या तपशीलवार माहिती 
 

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसची लस भारतात कधी येईल? अथवा त्याची किंमत किती असेल? ही लस कोठे मिळू शकेल ?असे आणि आणखी काही प्रश्न सगळ्या देशवासीयांच्या मनात भेडसावत असतील हे लक्षात घेऊनच सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली लस ही पहिल्या टप्प्यात म्हणजेच 20 फेब्रुवारीपर्यंत आरोग्य कर्मचारी तसेच वृद्धांना देण्यात येईल  तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल मध्यावधीपर्यंत सर्वसामान्यांना उपलब्ध होईल. त्याशिवाय या कोरोना लसीची किंमत दोन डोस मिळून अशी हजार रुपयांत उपलब्ध होणार आहे.

पूनावाला यांच्या म्हणण्यानुसार साधारण 2024 सालापर्यंत प्रत्येक भारतीयाचे कोरोनाचे लसीकरण पूर्ण होईल. लस पुरवण्या व्यतिरिक्त बजेट, लॉजिस्टिक व पायाभूत सुविधा यांचीही आवश्यकता भासेल तसेच देशातील सर्वांनाचा लस घेण्यासंबंधी इत्यंभूत माहिती पुरविली जाईल.

लसीच्या किंमतीबाबत सविस्तर माहिती देताना पूनावाला म्हणाले की, आवश्यक अशा दोन डोसची किंमत एक हजार पर्यंत आहे. त्यासाठी भारत सरकार कोरोना लस खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करणार असून त्यामुळे ती लस स्वस्तात उपलब्ध होईल व किंमतही कोवॅक्सच्या आसपासच असणार आहे. अशाप्रकारे बाजारातील इतर लसींच्या किंमतीच्या तुलनेत आम्ही ही लस स्वस्तात उपलब्ध करून देत आहेत.

लस परिणामकार ठरेल की नाही याची आधी चिंता होती परंतु ऑक्सफर्ड एस्टोजेनिका लस वृद्धांवर प्रभावशाली ठरली आहे व लसीने टी सेलला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसले ज्यामुळे कोरोनाविरुद्ध लढा देण्यास लस अधिककाळापर्यंत प्रतिकारशक्ती प्रदान करू शकते.  सीरमची फेब्रुवरीपासून सुमारे 10 कोटी जनतेला डोस देण्याची योजना आहे तरीही त्यातून भारतात किती डोस देण्यात येईल याची अद्याप बोलणी सुरू असल्याचे पूनावाला यांनी सांगितले. 

दरम्यान चांगली खबर अशी आहे की, लहान मुलांसाठी कोरोना हा विशेष धोकादायक नाही. ऑक्सफर्डची कोरोनाची लस ही स्वस्त व सुरक्षित आहे तसेच ही लसीचे जतन करण्यासाठी दोन ते आठ डिग्री सेल्सियसची आवश्यकता असते. आणि हे तापमान भारतातील कोल्ड स्टोअरेजमध्ये सहज शक्य आहे. त्यामुळे लसीचे जतन करणे तितकेसे अवघड काम रहाणार नाही हे निश्चित.