होळीच्या अगोदर भारतात कोरोनाची लस येईल

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा विश्वास 

 

नवी दिल्ली  - होळीच्या अगोदर भारतात  कोरोनाची लस येईल, असा  विश्वास  केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्यक्त केला आहे,  ही  लस 135 करोड भारतीयांना प्रदान करण्याचे प्राधान्य हे वैज्ञानिक मूल्यांकनावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 मागील 11 महिन्यांचा आढावा सांगत असताना आरोग्यमंत्री म्हणाले की, फारच कमी अवधीत कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भावावरती नियंत्रण ठेवण्यात भारत पहिल्या काही देशांच्या यादीत अव्वल ठरलेला आहे. जरी सुरूवातीला पीपीई कीट, व्हेंटीलेटर, एन 95 मास्कची कमतरता भासली तरीही काही महिन्यांतच या गोष्टी आम्ही जगाच्या विभिन्न भागातून निर्यात करण्यात सक्षम झालो.

माझा विश्वास आहे की पुढील तीन चार महिन्यांत कोरोनाची लस निश्चितपणे तयार होईल, लसीची प्राथमिकता वैज्ञानिक आकडेवारीच्या आधारे ठरविली जाईल. आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स यांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल त्यापोठोपाठ वृद्ध आणि आजारी लोकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाबाबत एक विस्तृत योजना आखण्यात येत आहे. त्याच ब्लू प्रिंटवर चर्चा करण्यासाठी वैक्सीन इंटेलिजेन्स प्लॅटफोर्म तयार केला आहे. 2021 साल आपणा सर्वांना चांगले वर्ष असेल अशी आशा आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीविरोधात लढताना सरकारने अनेक अशी अत्यंत धाडसी पावले उचलेली आहेत. जनता कर्फ्यू हा आपल्या पंतप्रधान नरेंद्र मेदी यांचा एक अनोखा प्रयोग होता, त्यात नागरिकांचा देशव्यापी सहभाग होता. लॉकडाऊन आणि अनलॉक अंमलबजावणीचा निर्णय हा महामारी दरम्यान घेतलेला केंद्र सरकारचा धाडसी निर्णय होता. याशिवाय म्ही देशातील परिस्थिती उत्तमरित्या हाताळलेली आहे. अगदी कोरोना फोफावलेला असताना त्याचवेळी विमानतळे, बंदरे व इतरत्र सीमांवर बंधी घातली गेली होती.