होमिओपॅथीक शास्‍त्राचे जनक डॉ. सॅम्युल हॅनिमन 

 

 होमिओपॅथीक शास्‍त्राचे जनक डॉ. सॅम्‍युअल हॅनिमन यांच्‍या २६८ व्‍या जयंती निमित्‍त  आज दि. १० एप्रिल २०२३ रोजी येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज बीडचे माजी प्राचार्य / संचालक व केंद्रिय होमिओपॅथीक परिषदेचे माजी उपाध्‍यक्ष डॉ. अरूण भस्‍मे यांनी अनेक ग्रंथाच्‍या आधारे अनुवादीत केलेला डॉ. सॅम्‍युअल हॅनिमन यांच्‍या जीवनावर प्रकाश टाकणारा लेख या ठिकाणी प्रसिध्‍द करण्‍यात येत आहे.

------------------------------

    भौतिक विकासाने गुंग झालेल्‍या आजच्‍या जगातील जनतेला सत्‍याची मांडणी करताना देखील विचारांची दिशा भौतिक आधारावरच बसविण्‍याची इच्‍छा होते. वास्‍तविक पाहता सत्‍य शोधण्‍याची अथवा सिध्‍द करण्‍याची आवश्‍यकता पडु नये कारण सत्‍य हे सत्‍यच आहे. परंतु असत्‍याचा प्रभाव आजपर्यंत सत्‍यासंबधी विश्‍वास असतांना कोणीही नाहीसा करु शकला नाही. अणुच्‍या विभाजनाने उत्‍पन्‍न होणा-या शक्‍तीचा महाभयंकर प्रताप आजच्‍या अणुयुगात विकासाला व नाशाला किती प्रमाणात प्रभावी ठरु शकतो याचा अनुभव डोळयासमोर दिसल्‍याने प्रत्‍येक व्‍यक्‍ती या सिध्‍दांताच्‍या संशोधकाला जगातील श्रेष्‍ठ शास्‍त्रज्ञांच्‍या मालिकेत नेऊन बसविते. त्‍याच प्रमाणे प्रत्‍येक पदार्थातील अणुंचे विभाजन कालमर्यादे पर्यंत नेहणे सत्‍य आहे. व ते विभाजन रोगी, दुःखी, जनतेला सदृढ आरोग्‍य देण्‍याचे साधन आहे. 

सिध्‍दांच्‍या प्रयोगाने व सिध्‍दीकरणाने सिध्‍दांत मांडणारा डॉ. सॅम्‍युअल हॅनिमन जनतेच्‍या दरबारात उच्‍च सिंहसनावर जाऊन बसला आहे. महापुरुष् कोणत्‍याही शाळेत किंवा कारखान्‍यात तयार होत नसतात. ते परमेश्‍वरी प्रेरणेने ऊत्‍पन्‍न होत असतात व त्‍यांची ऊत्‍पत्‍ती ही जगाच्‍या कल्‍याणाकरिताच असल्‍याने त्‍यांच्‍या मार्गात येणारी सर्व संकटे नाहीशी होऊन सत्‍याचा परिचय जगाला देत असतात. असा आरोग्‍य शास्‍त्रात क्रांती करणारा जनतेच्‍या सदृढ आरोग्‍याचे साधन व तत्‍व सांगणारा महापुरुष १० एप्रिल १७५५ साली जर्मनीतील सॅक्‍सोनी खेडयात मातीच्‍या भांडयाना रंग देणा-या गरिब बापाच्‍या पोटी जन्माला आला. महापुरूषाची ऊत्‍पत्‍ती त्‍यांनी केलेल्‍या कार्याची शहानिशा करतात. 

     डॉ. सॅम्‍युअल हॅनिमन यांचे मनाने ज्ञान लालसेची  इच्छा असल्याने मिळेल त्या वेळेचा व संधीचा योग्य उपयोग करून त्यांनी आपले ज्ञानर्जनाचे कार्य चालू ठेवले. तीर्व इच्छाशक्ती व महान परिश्रम करण्याची तयारी असताना परमेश्वरी प्रेरणा ही सहाय्यभुत झाली. परिणामतः वयाच्या १२  व्या वर्षी ते आपल्या अनुयायांना ग्रीक भाषा समजावुन देऊ लागले. वयाच्या २० व्या वर्षी ३ परदेशी भाषा व अनेक विषयात त्यांनी प्रावि‍ण्य मिळविले. आपल्या मुलाची ज्ञानर्जनाची इच्छा पाहून त्यांच्या पित्‍याने १७७५ साली लिपझिप विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण शिक्षण घेण्याची परवानगी दिली. तेथे उपजीविकेसाठी शिकणे व शिकवणी सुरू होते रात्री भाषांतर करणे व फुरसतीच्या वेळी इतरांना शिकविणे हा त्यांचा नित्यक्रम होवुन बसला. वयाच्या २४ व्या वर्षी त्यांचे अकरा भाषेवर प्रभुत्व होते.१० ऑगस्ट १७७९ साली त्यांनी एरलॅंजेन विद्यापीठाची एम.डी.ची डिग्री मिळवि‍ली.

     दिनी प्रतिदिनी येणा-या अनुभवामुळे  त्यांना असे वाटले की ते करीत असलेल्या रोगासंबंधीचा विचार हा परिपुर्ण नसुन पुस्तकी ज्ञानावर व पर्यायाने रोगासंबंधी अज्ञानावर आधारित आहे. त्यावर कराव्या लागणाऱ्या औषधाचे कार्य हे सुद्धा आज्ञानावर आधारित आहे या तीर्व औषधाचा वापर आरोग्य देण्याऐवजी मृत्युलाच आवाहान करीत आहे. अशा प्रकारे अॅलोपॅथी करणारे प्रमाणिक चिकित्सक या नात्‍याने जनतेचे दुःखे वाढविणारा व पर्यायाने एक खुनी म्हणून त्यांच्या हृदयात एक कंप सुरू झाला व त्यामुळे त्यांनी चिकित्सा करणे सोडून रसायनशास्त्र व साहित्य विषयातच आपले लक्ष घातले.

     भावना व सत्तेची जोड असणारी व्यक्ती सदैव गुणी  प्रकृती असते. त्या काळी चिकित्सेच्या पद्धती या भयानक व अपरिपक्व होत्या. राजाश्रयामुळे त्यांना राजमान्यता मिळालेली होती सामाजिक मान्यता व बुध्‍दीमत्‍ता या दोन्‍ही गुणामुळे डॉ. सॅम्‍युअल हॅनीमन यांनी आपल्या मनाचे  व प्रमाणिकतेचे विरुद्ध अगणित संपत्ती त्यांना मिळणे शक्य झाले असते परंतु मनाच्या प्रामाणिकतेचा प्रभाव त्यांना अधोगतीकडे नेत असतांना ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. विल्यम क्‍युलेन यांच्या मटेरिया मेडिका या पुस्तकातील सिंकोना बार्क या विद्यापीठांमध्ये औषधाच्या निरोगी मनुष्यात मलेरियाचा ताप लक्षणे उत्पन्न होतात व त्याच्याच सूक्ष्म भाग घेतल्याने ती लक्ष नाहीसे होतात हे त्यांनी वाचले.तेवढयावर त्यांचे समाधान झाले नाही तर त्यांनी स्वतःवर सिंकोना सालीचा रस काढून तो रस स्‍वतःवर घेतल्यानंतर काही वेळात त्यांच्यावर मलेरियाची लक्षणे उत्पन्न झाली व ते औषध कोणते त्यांची लक्षणे नाहीशी झाली. 

     या संबंधाचा विचार त्‍यांना अस्वस्थ करावयास लागला. ही घटना लिपझिक येथे १७९० साली घडली. अत्यंत सूक्ष्मपणे निरक्षण व प्रयोग करून काही प्रयोग स्वतःवर, स्वतःच्या कुटुंबीयांवर, मित्रावर करुन सिकोना बार्ग प्रमाणेच सर्व औषधांच्या कार्याची परिमिश्रण त्यांना समान दिसले.१७८२ साली डेस्‍सु येथे जेव्हाना कुचलर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नंतर त्यांनी चिकित्सा करण्यास सुरुवात केली.  ध्‍येयासंबंधी जिद्द व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे  प्रतिदिन दारिद्र्यात वृध्‍दी होत होती. १७९१ साली त्यांना खेड्यात जावे लागले अशा परिस्थितीत त्यांची मुले आजारी पडली व सर्व भयानक आपत्तींना तोंड देत असताना आपल्या ध्‍येयावर अधिष्ठित राहुन त्यांनी रोगमुक्‍तीचा सिद्धांत त्यावेळी शोधून काढला. प्रत्येक प्रयोगाचा निर्ष्‍कर्ष एकच होता की भौतिक अवस्थेतील प्रत्येक औषध सुदृढ व्यक्तीच्या प्रकृतीवर आजार उत्पन्न करते. आणि त्याच औषधाचा सूक्ष्मभाग त्या रोगाचा रोग नाहीसा करतो अशा प्रकारे आरोग्य जगतात चिकित्‍सेचा नवीन सिद्धांत समःसम् शमयति जन्म पावला. 

आपत्ती एकटया येत नसतात औषधाचा वापर असलेल्या लोकांचा समूह स्वतःच्या मनातील शुद्ध भावना तथाकथित चिकित्सक व उपमर्द कारण कायद्याचा त्रास या सर्व गोष्टींना त्रासून या महान व्यक्तीला देश सोडावा लागला लागून दारोदार भटकावे लागले. सन १७९७ साली आपले सारे कुटुंब थोडीसे घरगुती सामान घेऊन एका खटा-यातुन हॅम्‍बुर्ग कडे रवाना झाले. दुर्देवासकट सर्व संकटे त्यांच्या पाचवीला पुजलेले होती. एका चढाईवर चढुन जात असतांना तो खटारा उलटला त्यांचा लहान मुलगा जखमी होऊन तात्‍काळ मरण पावला एका मुलीचा पाय तुटला.डॉ हॅनीमन स्‍वतःही जखमी झाले. सर्व घरगुती सामान खाली असलेल्या तळ्यात पडून वाहून गेले सत्य बोलताना ती खटला वाटले तरी परिणाम प्रत्येकाच्या उपयोगात पडते क्षणीक फायद्याकरता असल्याची कास धरणारे आपल्या ध्‍येयाला व तत्वाला विचलित होणारे व्यवहारात शहाणे दिसत असतील परंतु कष्टाची व संकटांची विशांत समोर दिसत असताना सत्याची कास न सोडणारा तत्‍वेला हा पथदर्शक समजला जातो. 

     कोणत्याही महान व्यक्तीचा इतिहास हा त्यांच्या मार्गात येणाऱ्या भयंकर अडचणी स्वजनातुन उपहास सामाजिक रचनेकडुन बहिष्‍कार इ. सर्व संकटांनी ग्रस्‍त असतो व त्या सर्वावर विजय मिळवुन प्रत्येक तत्‍वेला आपल्या ध्‍येय सिंद्धांतात यशस्वी होतो.दुःख दारिद्र्य प्रत्येक कलेची जन्मदाती आई आहे हीच गोष्ट डॉ. सॅम्‍युअल हॅनीमन यांचे बाबतीत  प्रकर्षाने अनुभवास आली. जीवनाचे प्रत्येक कार्य हे काव्य म्हणून घेण्‍याकरिता दारिद्रय व परिश्रम या द्वारे प्रगट होते त्यानंतर त्यांनी ऑरगॅनन ऑफ मेडीसीन हे पुस्तक लिहून प्रकाशित केले त्या पुस्तकात होमिओपॅथीची तत्त्वे सांगितली आहेत ही तत्वे कधीही न बदलणारे आहेत. व ती निसर्गावरच अवलंबून आहेत.


     सुख आणि  दुःख बरोबरच असतात ज्या माऊलीने म्हणजे त्यांच्या पत्नीने जन्‍मभर दुःखाचा महान वाटा उचलला,११ मुले व त्यांनी डॉ. सॅम्‍युअल हॅनीमन यांची सेवा केली, ती माऊली ३१ मार्च १८३० या वर्षी परलोकवासी झाली. डॉ. सॅम्‍युअल हॅनीमन या संबंधी म्हणतात कि प्रत्येक व्यक्ती संसारात इतकी मग्न होऊन जाते की, परमेश्वरापासून मिळत असलेल्या प्रेमाचा व आशीर्वादाचा सतत प्रवाह आपल्या जीवनात सर्व बर्‍यावाईट गोष्टी करण्याकरता एकमात्र कारण आहे व तोच कर्ता करविता आहे त्याची जाणीव विसरून जाते. त्यांच्या अखंडपणे मिळत असलेल्या कृपेला कृतज्ञ होते. चिकित्साशास्त्र समचिकित्‍सेद्वारे मानवतेची अहर्निष सेवा करणाऱ्या महान चिकित्‍सकाच्‍या जीवनात वयाच्‍या  ८० व्‍या वर्षी एक घटना घडली. २८ जानेवारी १८३५ रोज मेलानी डी हरबिली या ३५ वर्ष वयाच्या फ्रेंच विदुषीने त्यांच्याशी लग्न केले.या महान तत्‍वेत्‍याच्‍या जीवनातील अपूर्ण राहिलेल्या कार्यास परमेश्वरी योजनेनेच साथ द्यावयाचे ठरवुन डॉ सॅम्‍युअल यांच्या पाठीशी शारीरिक बळ तेजस्‍वी, बुद्धिमत्ता व आर्थिक विपुलता श्रीमती मिलानी डी हरबिली यांच्‍या विवाहाने उत्पन्न करून परमेश्वराने आपले अपूर्ण राहीलेले कार्य डॉ. सॅम्‍यंअल हॅनिमन यांच्‍या कडुन पुर्ण करुन घेतले.

     पॅरिस येथे अत्‍यंत सुखात असताना डॉ. सॅम्युअल हॅ‍निमन यांनी २ जुलै १८४३ रोजी इहलोकांची यात्रा संपविली व मृत्‍यु समयी त्यांनी म्हटले, मी व्‍यर्थ जगलो नाही.चिकित्सा शास्त्राच्या इतिहासात डॉ. सॅम्युअल हॅ‍निमन यांच्याशी तुलना करणारी, चिकाटी व सातत्य यांची तिव्रता,शास्‍त्रीय तत्त्वज्ञान यासंबंधी उच्चतम दृष्टिकोन असलेल्या तत्‍वेता झाला नाही. स्वतःच्या अक्षरात ५०० पानाचे असे २५ पुस्तके लिहिली १०० औषधांचे सिद्धीकरण केले.

     साधे व त्यांचे  ओजस्वी जीवन हे भावी पिढीला पथदर्शक ठरणार आहे प्रत्येक गरीब दुःखी व कष्टी रोगी होमिओपॅथीचा तात्‍कालीक गुण देणा-या व कायम रोगमुक्‍त करणा-या स्‍वस्‍त औषधामुळे डॉ. सॅम्‍युअल हॅनिमन यांच्‍या पवित्र आत्म्याला चिरंतन शांती देण्याची  प्रार्थना करीत आहे.

Dr Arun Bhasme
Ex. Principal / Director
S.K.H. Medical College, Beed