राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर दगडफेक 

 भूम तालुक्यातील पारडी फाटा येथे घटना 
 

उस्मानाबाद -  राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या गाडीवर दगडफेक  झाली आहे.  भूम तालुक्यातील पारडी फाटा घाटात बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. 


राष्ट्रवादीच्या गाव संपर्क अभियानला आदित्य गोरे जात असताना ही दगडफेक झाल्याचे समजते. ही दगडफेक राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे की गाडी लुटण्याच्या उद्देशाने झाली ? याबाबत प्रश्न चिन्ह  निर्माण झाला आहे. 

या प्रकाराची नाेंद वाशी पोलिसात झाली आहे. पाेलिसांनी तूर्तास अनाेळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद केला आहे.


हल्ल्यात गाडीची मागील काच फुटली असून गाडीत असणारे राष्ट्रवादी चे कार्यकर्ते व आदित्य गोरे सुखरूप असल्याचे समजते. आदित्य गोरे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जीवनराव गोरे यांचे चिरंजीव आहेत. 

राष्ट्रवादीच्या गाव संपर्क अभियानला आदित्य गोरे जात होते तेव्हा घाटात त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. या दगडफेकीत वाहनाची मागील बाजूची एक काच फुटली असून कोणीही जखमी नाही. आदित्य गोरे हे अजित पवार यांच्या मेहुणीचा मुलगा आहे.