जिल्हा शेतकरी बचाव समितीचे तुळजापुरात जागरण गोंधळ आंदोलन

इनामी जमिनी वर्ग एकमध्ये कायम ठेवण्याची सरकारला सद्बुद्धी मिळण्यासाठी आंदोलन
 

धाराशिव ः जिल्ह्यातील इनामी जमिनी वर्ग एकमध्ये कायम ठेवाव्यात, मदत मास, खिदमत मास, सिलींग जमीन व महार वतन वर्ग 1 मध्ये कायम ठेवावे, जमिनी खालसा करुन द्याव्यात, नजराणा व दंडाची आकारणी रद्द करावी व इतर मागण्यांसाठी जिल्हा शेतकरी बचाव समितीच्या वतीने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे शुक्रवार, 16 जून 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलेे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्यामुळे आता सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात हे आंदोलन केल्याचे समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी सांगितले. या आंदोलनात आराधी, गोंधळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दखल न घेतल्यामुळे शेतकरी व प्लॉटधारकांच्या समस्या दूर करण्याची सद्बुद्धी मिळो यासाठी जिल्हा शेतकरी बचाव समितीच्या वतीने शुक्रवार, दि. 16 जून 2023 रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, कार्याध्यक्ष राजाभाऊ बागल, दिलीप जाधव, सुभाष पवार पाटील, सल्लागार महादेव लिंगे, उमेश राजे, नेताजी पवार,  आनंद जगदाळे, अर्जुन पवार, मनोज राजे, सतीश राजे, प्रभाकर राजे, सौ.शीला उंबरे-पेंढारकर, संजय पवार, श्रीमंत वाघमारे, सुरेंद्र मालशेटवार, संदीप पवार यांच्यासह शेतकरी, प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.