उपलब्ध कोवॅक्सिन लस दुसऱ्या डोस साठी वापरा ... 

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
 

उस्मानाबाद -  केंद्र सरकारतर्फे ४५ वर्षावरील ज्या नागरिकांना कोवॅक्सिन लसचा पहिला डोस दिला आहे, अशा सुमारे ४ लाख नागरिकांना दुसऱ्या डोससाठी लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे. वस्तुतः राज्य सरकारकडे कोवॅक्सिन चे ४ लाख ७९ हजार डोस उपलब्ध आहेत, हे डोस प्राधान्याने ४५  वर्षाच्या पुढील नागरिकांना देणे आवश्यक असताना १८ ते ४४ साठी राखून ठेवणे अनाकलनीय असल्याचे मत व्यक्त करत सदरील साठा ४५  वर्षा पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोस साठी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील  यांनी मुख्यमंत्री  उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे केली आहे

            राज्य सरकार ने खरेदी केलेले ३ लाख कोविशिल्ड  व ४ लाख ७९ हजार कोवॅक्सिनचे असे एकूण ७.७९ लाख डोस उपलब्ध आहेत. कोवॅक्सिन लसचा दुसरा डोस ४ ते ६ आठवड्यात देणे अपेक्षित असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. राज्य सरकारकडे कोवॅक्सिन लस उपलब्ध असताना ज्यांना दुसऱ्या डोसची आता आवश्यकता आहे अश्यांना न देता तो साठा १८ ते ४४ वयोगटासाठी वापरण्याचा अठ्ठाहस अनाकलनीय आहे.  राज्य सरकारने खरेदी केलेला कोवॅक्सिन लसीचा साठा प्राधान्याने ४५ वर्षावरील दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना द्यायला हवा व केंद्र सरकारला याबाबत विस्तृत माहिती देवून त्यांच्याकडून येणाऱ्या पुढील लसीच्या साठ्यातून तेवढी संख्या ही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकाच्या लसीकरणासाठी वळवून वापरने अभिप्रेत आहे. दरम्यान उपलब्ध कोविशिल्ड लसीचा वापर १८ ते ४४ वयोगटासाठी सुरू ठेवता येईल 


आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्यासोबत काल याबाबत  सविस्तर चर्चा केली होती. तसेच आरोग्य मंत्री ना. राजेशजी टोपे यांना देखील याबाबत माहिती दिली आहे. परंतु या विषयाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री यांचा असल्याने राज्य सरकारकडे उपलब्ध असलेली कोवॅक्सिन लस ४५ वर्षा वरील दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.