कळंबसाठी ऑक्सीजन सुविधा असणारी अद्यावत रुग्णवाहिका

 

कळंब  - तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक रुग्ण  उशिराने दवाखान्यात दाखल होत असल्याने अथवा सहव्याधी असल्याने अत्यवस्थ होत आहेत. त्यामुळे अशा कोरोना रुग्णांवर कळंब येथील खाजगी व सरकारी रुग्णालयात उपचार करणे साठी मर्यादा येत आहेत.  अत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी उस्मानाबाद, लातूर, बार्शी, अंबाजोगाई अथवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी पुरेशा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत होती. ही गरज लक्षात घेऊन तुळजापूर-उस्मानाबाद चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कळंब करांसाठी तेरणा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ऑक्सिजन सुविधा असणारी अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. यामुळे कळंब तालुक्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.


सदरील रुग्णवाहिका कळंब येथे पोहोचताच भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय समोर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी जि. प.चे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, उपजिल्हाधिकारी अहिल्या जाठाळ, ह.भ.प.परमेश्वर महाराज बोधले, डॉ.प्रशांत जोशी,  भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, बाजार समिती सभापती रामहरी शिंदे, व्यापारी संजय देवडा, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, माणिक बोंदर, संदीप बाविकार, नाना पुरी, शीतल चोंदे, अशोक क्षिरसागर आदी उपस्थित होते. 


सदरील रुग्णवाहिके साठी गरजूंनी  

रामहरी शिंदे - 9822341433 

अजित पिंगळे- 9422466678

प्रशांत लोमटे- 9359049893

संदीप बाविकार- 9423717455

यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.