दहा वर्ष झाले असेल तर आधार कार्ड अपडेट करा

- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
 

उस्मानाबाद - प्रत्येक शासकीय कामकाजासह इतर सर्वच ठिकाणी आता आधार क्रमांक महत्वपुर्ण झालेला आहे. नागरिकांना मिळालेला हा युनिक आयडी आहे. या आधार क्रमांकावर अनेक कामे अवलंबून आहेत. आधार कार्डवर नागरिकांची अत्यावश्यक माहिती अपडेट असणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक दहा वर्षाला आधारकार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. उस्मानाबाद  शहरासह जिल्हयातील बहुतांश नागरिकांनी आधार अपडेशन केलेले नाही. आधार अपडेशन अभावी अनेक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी  दर दहा वर्षानी आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे.

          ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पुर्ण झालेली आहेत त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दर दहा वर्षानी शरीरात होणारे बदल, नागरीकांचे होणारे स्थलांतर, वैयक्तिक माहितीमध्ये होणारे बदल,

आधार सोबत लिंक केलेल्या मोबाईल क्रमांकात झालेला बदल, पॅन कार्डसोबत लिक करण्यात आलेला आधार क्रमांक, आधार कार्डवरील फोटो, बदल झालेला पत्ता इ. आवश्यक माहिती आधार कार्डवर अपडेट करणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांचे आधार कार्ड काढून दहा वर्ष पुर्ण झालेली आहेत अशा सर्व कर्मचा-यांची वरीलप्रमाणे आधार कार्डवरील  आवश्यक माहिती अपडेट करून घेण्यात आली.  याबाबत आपणास UIDAI यांच्याकडून  SMS  द्वारेही सूचित करण्यात येत आहे. 

           त्याअनुषंगाने सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.

1)आधार कार्ड कोठे अपडेट केले जाईल ?

उस्मानाबाद शहरासह जिल्हयातील पोस्ट कार्यालय, सीएससी केंद्र , महिला व बालविकास विभाग जि. प., बँक, महा ई सेवा केंद्र चालकाकडील आधार केंद्र इ. ठिकाणी आधार कार्ड अपडेट करण्यात येईल.

2)आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड अपडेट करताना मतदान कार्ड, पॅनकार्ड, वीजेचे बील किंवा पत्ता दर्शवणारे ओळखपत्र इ. कागदपत्राची आवश्यकता आहे.        

3)पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

पहिल्यांदा आधार कार्ड काढण्यासाठी पॅनकार्ड, वीजेचे बील किंवा पत्ता दर्शवणारे ओळखपत्र इ. कागदपत्राची आवश्यकता आहे.

4)0 ते 05 वर्षाच्या मुलांचे आधार कार्ड काढणे.

 0 ते 05 वर्षाच्या बालकांचे आधार काढणे आवश्यक आहे.अशा बालकांची आधार नोंदणी  अंगणवाडी    मध्ये किंवा हॉस्पीटलमध्ये करण्यात येते. पाच वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करून घ्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.