उमरगा : तिन्ही हॉटेल, लॉजचा परवाना रद्द करण्याची मागणी 

तुळजापूरातही काही लॉजवर चालतो वेश्याव्यवसाय 
 

उमरगा - उमरगा चौरस्त्यावरील काही लॉजवर खुलेआम वेश्याव्यवसाय चालत असताना उमरगा पोलीस डोळ्यावर काळी  पट्टी बांधून गप्प होते. उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन हॉटेल, लॉजवर छापेमारी करून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी १० पुरुष आणि नऊ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही जणांना सोडून देण्यात आले आहे. दरम्यान, तिन्ही हॉटेल, लॉजचा परवाना रद्द करण्याची मागणी होत आहे. 

उमरगा पो.ठा च्या हददीत उमरगा चौरस्ता नजीकच्या काही लॉजचे चालक आपल्या लॉजमध्ये काही महिलांदवारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पो.नि-गजानन घाडगे यांच्या पथकास मिळाली होती. यावर स्थागुशाचे पथक  व उमरगा   पो.नि- मुकुंद आघाव यांच्या  पथकाने  दिनांक 30.06.2021 रोजी  दुपारी चौरस्ता येथील लॉजेसची तपासणी सुरु केली.

या वेळी हर्ष रिसॉर्ट  बार लॉजींग पाठीमागील खोल्यांमध्ये, सुदर्शन लॉज मधील खोल्यांमध्ये तसेच अभिराज लॉज ॲन्ड  बिअर बार मधील खोल्यांमध्ये  बंगाल येथील प्रौढ महीलांकरवी वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याचे आढळले. पोलीसांनी संबंधीत वेश्या महिलांची रवानगी महिला सुधारगृहात करुन संबंधीत लॉजचे चालक-गुडौला गौड, संजय बनसोडे, कुलदीप घंटे, गणेश कुटटी, सचिन गायकवाड, सुभाष गुत्तेदार यांसह 09 वेश्या  ग्राहक  अशा एकुण 15 पुरुषांविरुध्द  भादसं कलम 343 सह अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा कलम 3,4,5 अंतर्गत 3 गुन्हे नोंदवले आहेत

हे आहेत आरोपी 

1) अनिल व्यंकटराव  गुरव 2) सिधार्थ रमेश बद्रे 3)किरण लक्ष्मण ढगे 4)किरण रमेश ताकळे 5) सद्दाम कलीम सुबेकर 6)  विष्णु केशव पवार 7) अभिषक हनुमंत पाटील 8) शरद बाबुराव पवार 9) सुभाष गुत्तेदार (लॉज मालक फरार) 10) आकाश कोराळे (लॉज चालक फरार), असे एकुण 10 आरोपी /  वेश्या व्यवसाय करण्या-या 06 महिला  ( मिळाला एकुण मुद्देमाल :- रोख रक्कम व मोबाइल व 15 कंडोम पॉकेट किंमत 1,06,220/- रुपये. )

तुळजापूरातही काही लॉजवर चालतो वेश्याव्यवसाय 

तुळजापूर हे आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र असतानाही येथे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. लातूर रोडवरील काही लॉजवर अवैध धंदे सुरु आहेत. येथे जुगार सुरु आहे तसेच काही  मुली आणि महिला यांना आणून वेश्याव्यवसाय केला जात आहे. स्थानिक पोलीस गप्प असल्याने स्थानिक गुन्हे शाखा उमरगा प्रमाणे तुळजापुरात धाडसी कारवाई करणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.