सुंभा गावामध्ये विजेचा शॉक लागून दोन शेळ्यांचा मृत्यू 

 

पाडोळी -  उस्मानाबाद तालुक्यातील सुंभा येथील शेतकरी  हणमंत बाबुराव सरवदे यांच्या दोन शेळ्या आज (दि.२३) सकाळी विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. 

सरवदे यांच्या घरासमोर गावाला विद्युत पुरवठा करणारा सिंगल फेज डीपी असून  आज अचानक त्या डीपी मध्ये स्फोट झाला आणि डीपी जवळ बांधलेल्या दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. 

सरवदे हे शेतमजूर असून त्यांनी मजुरी सोबत संसारात दोन पैश्याची भर पडावी म्हणून  एक शेळी आणि एक बोकड खरेदी केले होते. मात्र  विद्युत विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे या दोन्ही शेळी - बोकडाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला. 

 दरम्यान बेंबळी पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार  घायाळ यांनी घटनास्थळाचा पोलीस पंचनामा केला आहे.    शासनाने  आपणासआर्थिक मदत करावी, अशी मागणी सरवदे यांनी  केली आहे.