उस्मानाबाद शहराजवळ नविन सुसज्ज  क्रिडा संकुल होणार 

आ. कैलास  पाटील यांच्या मागणीवरून राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुल लहान पडत असल्याने शहराजवळ नविन सुसज्ज  क्रिडा संकुल व्हावे, यासाठी शिवसेना आमदार कैलास  पाटील यांनी कंबर कसली आहे. 

उस्मानाबाद  शहाराजवळ नविन सुसज्ज तालुका क्रिडा संकुल संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील यांनी पत्राद्वारे बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली होती त्याअनुषंगाने आज राज्याच्या उद्योग, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथिल मंत्रालय दालनात आढावा बैठक संपन्न झाली. 

उस्मानाबाद (धाराशिव) शहरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे सद्याचे क्रिडा संकुल विविध क्रिडाच्या खेळासाठी कमी पडत आहे. तालुका स्तरावर नविन सुसज्ज असे क्रीडा संकुल असावे. अशी क्रिडा प्रेमींची इच्छा व मागणी आहे. शहरात किंवा शहराच्या जवळ नविन सुसज्ज तालुका क्रिडा व्हावे व या क्रिडा संकुलासाठी एमआयडीसी कडील 16 एकर जागा मिळावी. यामध्ये 16 एकर जागेचा सविस्तर आराखडा प्रस्ताव उद्योग विभागाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत क्रिडा विभागाने तात्काळ पाठवण्यात यावा अशा सुचना आदिती तटकरे यांनी केल्या.

सदरील बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर, कळंब-उस्मानाबाद (धाराशिव) विधानसभा मतदारसंघाचे आ.कैलास घाडगे-पाटील, सह मुख्यकार्यकारी अधिकारी, मऔविम, मुंबई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मऔविम, मुंबई, प्रादेशिक अधिकारी, मऔविम, मुंबई, लातूर चे RO श्री.मेघमाळे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.