तेरणा कारखाना भैरवनाथ उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याची निविदा प्रक्रिया रद्द

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांना झटका
 

उस्मानाबाद – ढोकीचा तेरणा शेतकरी कारखाना शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या  भैरवनाथ उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याची निविदा प्रक्रिया रद्द डीएआरटी ( कर्ज वसुली न्यायाधिकरण ) न्यायालयाने रद्द केली आहे.   या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्षी  बँक व भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला आहे.


उस्मानाबाद तालुक्यातील  ढोकी येथील  तेरणा शेतकरी साखर कारखाना सन  २०१२ पासून बंद आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची तेरणाकडे व्याजासह ४२५ कोटी थकबाकी आहे.तीन वेळा निविदा प्रसिध्द केल्यानंतर शेवटी आलेल्या एकमेव भैरवनाथ शुगर्सनी निविदा जमा केली होती.उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना शिवसेना आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ उद्योगसमूहला २५  वर्षासाठी भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता मिळाली होती. 

ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारी भाडेतत्वावर देण्याच्या निविदा प्रक्रियेबाबत लातूरचे काँग्रेस नेते आणि मंत्री अमित देशमुख यांच्या ट्वेंटीवन शुगरने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती, ही याचिका कोर्टाने निकाली काढताचं ट्वेंटीवन शुगरला डीआरटी कोर्टात जाण्यास सांगितले होते.  त्यानंतर ट्वेंटीवन शुगरने डीएआरटी ( कर्ज वसुली न्यायाधिकरण ) न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होवून निविदा प्रक्रिया रद्द केली आहे.   या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्षी  बँक व भैरवनाथ उद्योग समूहाला मोठा झटका बसला आहे.