उस्मानाबाद जिल्ह्यातील 'या' केंद्रावर मिळणार ५ जून रोजी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस

 

उस्मानाबाद  - ४५ वर्षाच्या पुढील ज्या नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा‌ पहिला डोस व ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, केवळ अशा नागरिकांनाच दि.५ जून रोजी जिल्ह्यातील निवडक ७२ आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.

४५ वर्षाच्या पुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाईन वर्कर यांना फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात येणारी आरोग्य उपकेंद्र तालुकानिहाय पुढीलप्रमाणे - 

 उस्मानाबाद - खामगाव, काजळा, बामणी, तावरजखेडा, बोरखेडा, घाटंग्री, वाघोली व शिंगोली तर तुळजापूर तालुक्यातील उमरगा चिवरी, हंगरगा नळ, खडकी, तिर्थ खुर्द, चिकुंद्रा, देवसिंगा तु. व जळकोटवाडी तसेच उमरगा तालुक्यातील बेळंब, चिंचोली जहागीर, मळगी व जेकेकुर व लोहारा तालुक्यातील पांढरी विलासपूर, हिप्परगा रवा व तोरंबा तर कळंब तालुक्यातील वडगाव ज., आंदोरा, हासेगाव केज, गोविंदपुर, करंजकल्ला, मस्सा, बोर्डा, लोहटा पूर्व, घारगाव, चोराखळी व रत्नापूर तसेच वाशी तालुक्यातील मांडवा, लाखनगाव, विजोरा, घाटपिंपरी, कडकनाथवाडी व इंदापूर तर भूम तालुक्यातील वडगाव नाली, गिरवली, पखरुड, आष्टा, आरसोली, जांब, दुधोडी, पाटसांगवी  व ईडा व परंडा तालुक्यातील सोनारी, कुक्कडगाव, शिराळा, नालगाव, वाकडी, खासापुरी‌, ताकमोडवाडी व इनगोंदा या ५७ आरोग्य उपकेंद्रावर प्रत्येकी २५० अशा एकूण १४ हजार २५० लसी उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्रामीण भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 

उस्मानाबाद शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग रोड, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रामनगर, पोलिस रुग्णालय उस्मानाबाद, ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम या लसीकरण केंद्रावर प्रत्येकी २५० अशा एकूण २ हजार २५० लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 

तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद व जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद या लसीकरण केंद्रावर प्रत्येकी ३०० अशा एकूण १ हजार ८०० लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य उपकेंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा शासकीय रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालय अशा एकूण ७२ लसीकरण केंद्रावर १८ हजार ३०० नागरीकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. 


ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन किमान ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत व नवीन पहिला डोस घेणाऱ्यांनाच पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहेत. त्यासाठी डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदविलेले ओळखपत्र सोबत घेऊन जावे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होण्यास मदत होणार आहे. या दिवशी फक्त कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार असल्यामुळे इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. सदरील लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

यासाठी लाभार्थ्यांनी लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही.लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्याला पैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑन स्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे. तसेच लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असून यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहेत.

 ज्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा असे दोन्ही डोस दिले जाणार आहेत, अशा ठिकाणी दोन्ही डोसच्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र नोंदणी आणि रांगा ठेवण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी व उपस्थित लाभार्थ्यांनी देखील गर्दी न करता कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवीत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.