शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आत्मदहनाची मागणी

कोंडजीगडच्या शेतकऱ्याची व्यथा

 


उमरगा -  शेत शेजाऱ्याच्या सतत होणाऱ्या त्रासामुळे आणि प्रशासनातील निष्क्रिय अधिकाऱ्याकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे या त्रासाला कंटाळून  शेतकरी दयानंद जगन्नाथ माडजे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन देवून आत्मदहन करण्यासाठी परवानगी मागितली आहे,  त्यामुळे चटईवर बसून शेतकऱ्यांशी संवाद साधणारे जिल्हाधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष देवून संबधीत शेतकऱ्याला न्याय देतील का हे पहावे लागणार आहे 

मागील तीन वर्षांपासून त्यांच्या शेताशेजारील शेतकरी आबाराव हरिबा माडजे व त्यांचे दोन मुले दत्तात्रय व दिगंबर यांनी  दयानंद माडजे यांच्या शेतातील बांध फोडून  माती काढुन नेली आहे. त्यामुळे सदर ठिकाणी खड्डा पडल्याने जमिनीचे  मोठे नुकसान झाले आहे.यासंदर्भात  याबाबत मंडळ अधिकारी यांनी  पंचनामे करून त्याबाबतचे अहवालही प्रशासनाकडे सादर केले  आहे त्याचप्रमाणे संबंधितांना सूचना देवून दंडाची नोटीस बजावली आहे, परंतु तो अद्यापही ही कार्यवाही कागदावरच राहिला आहे.  

प्रशासनातील महसूल अधिकाऱ्याला संगनमत करून शेतशेजारी लोक अन्याय करत आहेत असे तक्रारीत म्हंटले आहे शेतीला जाताना रस्ता  अडवणे आणि दमबाजी करून मारहाण करणे, शिवीगाळ करून जमीन त् विकून जाण्यास प्रवृत्त करत आहेत. माझ्या अर्जाची दखल घेवून संबधितावर  कारवाई करावेत अशी मागणी माडजे त्यांनी केली आहे याबाबत न्याय नाही मिळाल्यास 26 जानेवारीला  आत्मदहन करून स्वतःला संपवणार  आहे असेही निवेदनात म्हंटले आहेत