सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावास 

न्याय मिळवून देणाऱ्या पोलीस अधीक्षकांचा  मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार
 

धाराशिव  :  तुळजापूर तालुक्यातील एका गावात सहा  वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 30 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. गावकऱ्यांनी त्यावेळी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आरोपीने बलात्कार व त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केल्याची घटना उघडकीस आली होती. तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता. 

जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणातून आंदोलने झाली होती. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी पोलीस प्रशासनाने आरोपीला तात्काळ शिक्षा होईल व कायदेशीर सर्व कारवाई होईल असे आश्वासन जिल्हाभरातील नागरिकांना दिले होते त्याचप्रमाणे पोलिसांनी योग्य कारवाई करत हे प्रकरण हाताळले आहे. वकिलांनी दिलेली बाजू व पोलिसांनी दिलेले पुरावे याच्या आधारे न्यायालयाने न्याय दिला.

पोलीस प्रशासनाने केलेल्या योग्य कारवाईमुळे या प्रकरणात लवकरात लवकर न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करत मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत सावंत यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी मसूद शेख, शेख आयाज, अन्वर शेख, बाबा मुजावर, इस्माईल शेख, खालील पठाण, बिलाल तांबोळी, आयाज काझी, वाजित पठाण ,अॅड आलिम ,इमरान खान, मुजीब काझी हे प्रतिष्ठित मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते 

जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने केलेल्या निदर्शन व मागणीनुसार या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूर येथील निलेश दत्तात्रय जोशी यांची नेमणूक प्रशासनाने केली होती त्यांना ऍड वैशाली देशमुख, यशश्री निलेश जोशी, ओंकार संतोष परदेशी यांची सहकार्य केले आहे या सर्वाचे देखील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.