ढोकीत शॉर्ट सर्किटमुळे दहा दुकाने जळून खाक

 

ढोकी - लातूर रोडवरील MSEB जवळील एका पत्र्याच्या कॉम्प्लेक्सला रविवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लावून दहा दुकाने जळून खाक झाली, त्यात सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले. 

या आगीमध्ये दयानंद कावळे यांच्या मालकीचे तुळजाभवानी एम्पोरियम यांचे तीन लाख रुपयाचे, अमोल गायकवाड यांच्या  समृद्धी ऑनलाइन यांचे तीस हजार रुपयांचे, प्रकाश गुरव यांच्या प्रकाश इलेक्ट्रिकचे सत्तर हजार रुपयांचे, रफिक सय्यद यांच्या राजासाब सायकल अँड प्लास्टिक स्टोअर्स एक लाख रुपयाचे,अब्रार कागदी यांच्या किसान ॲग्रो आणि स्टोअर्सचे बारा लाख रुपयाचे, गोविंद जाधव यांच्या गोविंद कलेक्शनचे पाच लाख रुपयांचे,हुसेन मशायक यांच्या मेट्रो टेलर्स या दुकानातील शिलाई मशीनसह दीड लाख रुपयाचे,ऋषिकेश कावळे यांच्या सृष्टी ऑटोमोबाईल्स मधील दुरुस्तीसाठी आलेल्या चार मोटरसायकल जळून खाक झाल्या असून त्यासोबत दुकानातील स्पेअर पार्ट व फर्निचर असा सहा लाख रुपयांचा ऐवज जळून खाक झाला आहे

. नावेद शेख यांच्या रजा इलेक्ट्रिक यांचे दीड लाख रुपयाचे तर नवनाथ समुद्रे यांच्या हरिओम फुटवेअरचे तीन लाख रुपयांचे असा तब्बल ३५ लाख लाख रुपयांचे नुकसान दुकांनाना लागलेल्या आगीत झाले.