तहसीलदार गणेश माळी यांना वाहतूक शाखेचे अभय 

सहायक पोलीस निरीक्षक या अमित मस्के यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी 
 

उस्मानाबाद - शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा लावल्याप्रकरणी तहसीलदार गणेश माळी यांच्याऐवजी चालक राजेश स्वामी यांना पाचशे रुपये दंड करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे. वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक या`अमित मस्के यांनी माळी यांना पाठीशी घातल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. 

उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांनी त्यांच्या ताब्यातील शासकीय वाहनावर बेकायदेशीर अंबर दिवा लावला होता. त्याची तक्रार सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केल्यानंतर याप्रकरणी पाचशे रुपये दंड करण्यात आल्याचे पत्र वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक या`अमित मस्के यांनी दिले होते, मात्र हा दंड तहसीलदार गणेश माळी यांच्याऐवजी चालक राजेश स्वामी यांना करण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे.

वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक या`अमित मस्के यांनी जाणीवपूर्वक  तहसीलदार गणेश माळी यांना पाठीशी घातले असून, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक या`अमित मस्के यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.