आयपीएल क्रिकेट मॅचच्या सट्टा प्रकरणी लॉजमालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी 

 

धाराशिव  मुंबईच्या दहिसर येथील भव्य चैतन्य दवे यांनी 6 मे धाराशिव शहरातील बस स्थानक जवळील हॉटेल प्रतिभा एक्झक्युटिव्ह लॉजमध्ये मुंबई इ्ंडियन्स विरुध्द चेन्नई आणि रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरुध्द डेल्ही कॅपीटल्स या दोन संघादरम्यान चालु असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा (बेटींग) जुगार चालविला. सट्टा चालविण्या करीता नागपूर येथील आशिष नेवारे यांच्याकडून खोटे सांगून त्यांचे आधारकार्ड व सिमकार्ड घेऊन  सिमकार्डचा वापर करुन फोनद्वारे व्हॉटसअपद्वारे क्रिकेट सट्टा चालवला.

 

 प्रतिभा एक्झक्युटिव्ह लॉजमध्ये राहण्याकरीता स्वताची ओळख लपविण्याचे उद्देशाने बनावट आधारकार्ड देऊन फसवणूक केली.धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार हुसेन नसीर खान सय्यद यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कलम 420, 468, 471 सह म.जु.का. क. 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.याप्रकरणी   याप्रकरणी हॉटेल प्रतिभा एक्झक्युटिव्ह लॉजच्या मालकाविरुद्ध कोणतीही कारवाई  न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  याप्रकरणी लॉजमालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे 
'

या प्रकरणातील अन्य आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातीलं असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी सांगितले. लॉजमालकास देखील सहआरोपी केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.