उस्मानाबाद आगारात डिझेल तुटवडा 

अनेक मार्गावरील एस. टी. नियमित फेऱ्या रद्द 
 
गलथान कारभाराचा प्रवाश्यांना फटका

उस्मानाबाद - उस्मानाबाद आगारातील अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आज आगारात डिझेल पुरवठा झाला नाही. याचाच परिणाम म्हणून काही मार्गावरील नियमित फेरा रद्द करण्यात आल्या. या गलथान कारभाराचा फटका प्रवाश्यांना बसला. 


उस्मानाबाद एसटी आगारात आज डिझेल नसल्याने मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.आज सकाळपासूनच डिझेल नसल्याने काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या , काही उशिराने धावल्या तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना डिझेलसाठी जवळचे डेपो गाठून पुढे जावे लागले.शिवाय एक्स्प्रेस गाड्यांना पुढील जवळच्या डेपोत डिझेल भरुन मार्गस्थ होण्यास सांगण्यात आले.

गाडीत शिल्लक असलेल्या डिझेलवर लांब पल्ल्याच्या गाड्या मार्गस्थ करुन जवळपासच्या डेपोत डिझेल भरण्याचे आदेश देण्यात आले.शिवाय अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

अखेर सायंकाळी 5-30 च्या दरम्यान डिझेल टॅकर आगारात दाखल झाले असले तरी डिझेल उतरवून घेणे व बस मध्ये डिझेल भरण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो.