९ व १० जून रोजी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा दुसरा डोस

 

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दि. ८ व १० जून रोजी देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ६ ग्रामीण रुग्णालय, ४ उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. 

ज्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस १० मे अथवा ११ मे रोजी जिल्ह्यामध्ये आयोजित कोव्हॅक्सिन लसीकरण सत्रामध्ये घेतला होता. केवळ अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड किंवा पहिला डोस घेतला त्यावेळेस नोंदवलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. त्यामुळे दुसरा डोस देण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे. तर या दिवशी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांना केवळ दुसरा डोस देय असणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार असल्यामुळे या व्यतिरिक्त इतर नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये. लसीकरण करण्यात येणारी आरोग्य केंद्र पुढील प्रमाणे -  

ग्रामीण रुग्णालय मुरूम २३०, ग्रामीण रुग्णालय सास्तूर २४०, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम प्रत्येकी २५०, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा प्रत्येकी ३०० व जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद ४५० या केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.  जिल्ह्यामध्ये ९ जून आणि १० जून रोजी प्रत्येक दिवशी एकूण ११ लसीकरण केंद्र कार्यान्वित असून हे लसीकरण सत्र सर्व तालुक्यामधून राबविले जाणार आहेत. त्यामुळे शक्यतो लाभार्थ्यांनी या तालुक्यामध्ये अथवा रुग्णालयांमध्ये पहिला डोस घेतला होता. त्याच ठिकाणी दुसरा डोस घेण्यासाठी गेल्यास गर्दीत टाळता येईल. लाभार्थ्यांना लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार असल्यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. 

संबंधित ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. तर उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एच.व्ही. वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.