उस्मानाबाद जिल्ह्यात अंगणवाडी सेविका-मदतनीस भरती
उस्मानाबाद -एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रा.प्रकल्प वाशी अंतर्गत अंगणवाडी सेविका,/मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या पदासाठी अटी व शर्तीनुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
अंगणवाडी निहाय भरावयाच्या गावाचे नाव व पदांचा तपशील-
गोजवडा-मदतनीस-एक,बावी-सेविका एक,तेरखेडा-मदतनीस-दोन,मसोबाचीवाडी-मदतनीस-एक, नांदगांव-सेविका एक,मदतनीस-एक,कडकनाथवाडी-मदतनीस-एक, इसरुप-सेविका एक, पारा-मदतनीस-एक,सारोळा (मां)-मदतनीस-एक,पिंपळगांव(लि) झोपडपटटी-मिनी सेविका एक,पारगांव-मदतनीस-एक,जेबा-सेविका एक,दहिफळ-मदतनीस- एक,घाटपिंपरी- मदतनीस-एक,तांदुळवाडी-मदतनीस-एक,गोलेगांव-सेविका एक,गोलेगांव- सेविका एक, महालदारपुरी -मदतनीस- एक.
या भरती प्रक्रियेत पदासाठीचे अर्ज पत्र दि.09 जुलै-2021 पर्यंत प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत,असे वाशी येथील बालविकास प्रकल्प अधिकऱ्यांनी कळविले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील अंगणवाडीत सेविका-मदतीस भरती
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुका एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रा.प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी अटी व शर्तीनुसार भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
गावाची नावे व पद पुढीलप्रमाणे :
अंबेजवळगा मदतनीस दोन, पळसवाडी सेविका एक, देवळाली सेविका-एक, बामणी मदतनीस दोन, पोहनेर, बावी, मेंडसींगा, गौडगांव, केशंगाव, महादेववाडी, दारफळ या ठिकाणी प्रत्येकी एक मदतनीस भरती करण्यात येणार आहेत.
या भरती प्रक्रियेत पदासाठीचे अर्ज पत्र दि.16 जुलै-2021 पर्यंत प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सु्ट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जाणार आहेत. असे उस्मानाबाद येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
****