तुळजापूर अंतर्गत अणदूर, सावरगाव व काटगाव या विभागात अंगणवाडी मदतनीस पदांची भरती
धाराशिव :- एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प, तुळजापूर अंतर्गत अणदूर, सावरगाव आणि काटगाव या विभागामध्ये गावातील नमूद केलेल्या अंगणवाडी मधील रिक्त असलेले मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त झालेली पदे महाराष्ट्र शासन, महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयामधील निकष, अटी, शर्ती, गुणदान पध्दतीच्या आधिन राहून मिनी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी फक्त त्या त्या गावातील पात्र महिला उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
तुळजापूर अंतर्गत अणदूर विभागातील शहपूर अंगणवाडी (क्र.916) आणि पुजारी तांडा अणदूर (क्र.906) तसेच सावरगाव विभागातील सावरगाव अंगणवाडी (क्र.811) मध्ये प्रत्येकी एक मदतनीस आणि काटगाव विभागातील टेलरनगर अंगणवाडी (क्र.522) मध्ये एक मिनी अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदासाठी प्रकल्प कार्यालयाने विहीत नमुन्यातील प्रमाणित केलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्र व प्रमाणपत्रासह परिपूर्ण भरलेला अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, जुना सरकारी दवाखाना, तहसील कार्यालयाच्या शेजारी, मंगळवार पेठ, तुळजापूर यांच्या कार्यालयात दि.03 जुलै 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारले जातील.