तुळजापुरात मयुर लॉजवर छापा 

वेश्या व्यवसाय करणाऱ्या ९ महिला आणि सात पुरुष सापडले 
 

तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे वास्तव्य असलेल्या तीर्थक्षेत्र ठिकाणी एका लॉजवर स्थानिक पोलिसांच्या कृपेने राजरोस वेश्या व्यवसाय सुरु होता. त्याची थेट तक्रार पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली होती.एसपीच्या आदेशानंतर या लॉजवर आज छापा मारण्यात आला आहे. 

लातूर रोडवरील मयुर  लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला असता, वेश्या व्यवसाय करणाऱ्या ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

लातूर रोडवरील या लॉजवर गेल्या अनेक दिवसापासून राजरोस वेश्या व्यवसाय सुरु होता, मात्र स्थानिक पोलीस त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत होते. त्याची थेट  तक्रार पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याकडे करण्यात आली होती. 

एसपीच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही वेळापूर्वी या लॉजवर छापा मारला असता, त्यावेळी  वेश्या व्यवसाय करणाऱ्या ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडले आहेत. 

या लॉज मालकाचे आणि स्थानिक पोलिसांचे साटेलोटे सुरु होते. महिन्याला चिरीमिरी सुरु होती. त्यामुळे 'तेरी भी चूप, मेरी भी चूप ' असे सुरु होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारलेल्या छाप्यात चक्क ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 


अनैतीक मानवी व्यापार प्रकरणी 5 व्यक्तींवर गुन्हा दाखल

 तुळजापूर: तुळजापूर येथील ‘जगदंबा देवी यात्री निवास’ येथे अनैतीक मानवी व्यापार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन तुळजापूर पो.ठा. चे पोउपनि- श्री विकास दांडे यांच्यासह पथकाने छापा टाकला. यावेळी लॉज चालक- अतुल शिंदे, व मालक- दिलीप भोसले, दोघे रा. तुळजापूर तसेच विशाल आकाडे, रा. तिर्थ, सिध्देध्वर म्हेत्रे, रा. काक्रंबा, लॉज कामगार- आशिष मोटे, रा. बामणी (वाडी), बाळु कावरे, रा. तुळजापूर हे सोलापूर येथील 8 महिलां मार्फत नमूद लॉज मध्ये वेश्या व्यवसाय चालवत असतांना आढळले. संबंधीत महिलांची रवानगी परजिल्ह्यातील महिला सुधारगृहात करण्यात येउन नमूद 5 व्यक्तींना अटक करुन त्यांच्याविरुध्द अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा कलम- 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.