गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्याऐवजी पदोन्नती
उस्मानाबाद - शेकापूर आणि शिंगोली ग्रामपंचायत मध्ये गैरव्यवहार करणारा ग्रामसेवक एस.व्ही. तेगमपुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई न करता उलट त्यास ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सन २०१३ - १४ मध्ये तेगमपुरे यांच्यावर ४६ हजार ४७९ तर शिंगोली मध्ये १ लाख ५७ हजार ९५३ रुपयाचा गैरव्यवहार केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
तेगमपुरे यांच्यावर याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्याऐवजी तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी पाठीशी घातले. तद्नंतर एस.व्ही. तेगमपुरे यांना ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली असून त्यांना सांजा ग्रामपंचायत देण्यात आली आहे.
एस.व्ही. तेगमपुरे यांना उस्मानाबादच्या आसपासच्या गावामध्ये ड्युटी देऊन गटविकास अधिकारी हात ओले करून घेत असल्याची चर्चा आहे.