प्रेम शिंदे संशयास्पद मृत्यू प्रकरणी वाखरवाडीत ग्रामसभा 

मुख्य आरोपी काका उंबरे यास दोन दिवसांत अटक न केल्यास वाखरवाडीत चूल बंद 
 

धाराशिव - प्रेम शिंदे याच्या संशयास्पद मृत्यू  प्रकरणी आज वाखरवाडीत ग्रामसभा घेण्यात येऊन ग्रामस्थांनी  आपल्या संतप्त भावना  व्यक्त केल्या. मुख्य आरोपी काका उंबरे  यास दोन दिवसांत अटक न केल्यास घरोघरी  चूल बंद  करून आमरण उपोषण  करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

धाराशिव  तालुक्यातील वाणेवाडी येथील एका अध्यात्मिक आश्रमशाळेत दहावीत शिकणाऱ्या प्रेम लहू शिंदे ( वय १४ ) याचा मागील शनिवारी संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली असली तरी मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यास पोलिसांनी सहा दिवस झाले तरी अटक केलेली नाही.

प्रेम शिंदे याचे मूळ गाव  वाखरवाडी असून, या गावात या मृत्यू प्रकरणी शोककळा पसरली आहे. प्रेम शिंदे याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी वाखरवाडीकर पुढे सरसावले असून, आज सकाळी गावातील हनुमान मंदिरात सरपंच नवनाथ सुरवसे यांच्या  अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अनेकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या तसेच मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यास दोन दिवसात अटक न केल्यास घरोघरी चूल बंद करून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रेम शिंदे याने आत्महत्या केल्या असून, त्याचा खून करून प्रेत झाडास लटकावल्याचा आरोप यावेळी अनेकांनी केला. प्रेम शिंदे याच्या  मृत्यू प्रकरणी ढोकी पोलीस दबावाखाली काम करतअसून, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे तात्काळ द्यावा, आरोपीविरुद्ध भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा, मुख्य आरोपी काका उंबरे आणि माऊली महाराज उंबरे यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई  करावी  अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

<a href=https://youtube.com/embed/FkDW4oOe--Y?autoplay=1&mute=1><img src=https://img.youtube.com/vi/FkDW4oOe--Y/hqdefault.jpg alt=""><span><div class="youtube_play"></div></span></a>" style="border: 0px; overflow: hidden"" style="border: 0px; overflow: hidden;" width="640">