पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी 

उस्मानाबाद लाइव्हचा हवाला देत आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार 

 

ढोकी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांनी कोविड- १९ नियमांचे उल्लंघन करून शासकीय परिसरात वाढदिवस साजरा केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याकडे केली आहे. 

पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांची तेर पोलीस चौकीला ड्युटी असून, त्यांनी १५ जुलै रोजी आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात तेही पोलीस चौकीत साजरा केला होता. 

राजकीय नेत्याला लाजवेल असा तेरच्या पोलिसाचा वाढदिवस साजरा ...


"राजकीय नेत्याला लाजवेल असा तेरच्या पोलिसाचा वाढदिवस साजरा ...सोशल डिस्टिन्सिंगचा पुरता बोजवारा"  ...असे वृत्त उस्मानाबाद लाइव्हने १६ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते. सुभेदार यांनी या बातमीचा आधार देत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला आहे.


पोलीस नाईक प्रदीप मुरळीकर यांच्याविरुद्ध भादंवि १८६० चे कलम १८८, २६९,२७०,२७१ सह कलम २,३,४ ( साथ रोग प्रतिबंधक ) अन्वये तात्काळ गुन्हा नोंद करावा, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.