कोरोनाचा कहर  : उस्मानाबाद जिल्ह्यात २४ जानेवारी रोजी २६८ रुग्णाची भर 

जिल्ह्यात  ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७५८
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या  झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉन रुग्णसंख्येतही भर पडली आहे, सोमवार  दि.२४ जानेवारी रोजी एकूण २६८ रुग्णाची भर पडली. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १७५८ झाली आहे. 
 ,
आज  पॉजिटीव्ह आलेल्या रुग्णामध्ये  उस्मानाबाद ४२, तुळजापूर ४५, उमरगा ७४, लोहारा १९, कळंब १५ , वाशी ३५ , भूम १९, परंडा १९ असा समावेश आहे ,तसेच दिवसभरात ३२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 


उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार २६३  रुग्ण आढळले असून , पैकी ६७ हजार ४१० रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत २०८५ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.