... अन्यथा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करा 

उस्मानाबादेत संभाजी बिग्रेडची मागणी 
 

उस्मानाबाद - सास्तूर  येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ दि. 26 ऑक्टोबर  रोजी लोहारा शहरात विविध मागण्याकरिता सकल समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.  परंतू या मोर्चा मध्ये सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर भा दं सं कलम 188, 269, सह महाराष्ट्र covid-19 उपाय योजना नियम 19 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) अन्वये सरकारतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे तत्काळ मांगे घ्यावे अन्यथा भा. दं. वि.कायद्यान्वये लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संभाजी बिग्रेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सास्तुर येथे काढण्यात  आलेल्या मोर्चात सहभागी लोकांनी covid-19 चे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी बाळगली होती सदर मोर्चा हा मूक मोर्चा होता. सदर मोर्चात कसल्याही प्रकारची घोषणाबाजी नव्हती.  सदर काढलेला मूक मोर्चा मध्ये हा मोर्चा शांततेत लोहारा तहसील कार्यालयावर जाऊन मान्यवरांची मनोगते व्यक्त करून लोहारा तहसीलदार यांना सकल समाजाच्या वतीने निवेदन देऊन मूक मोर्चा विसर्जित करण्यात आले. 

असे असताना देखील सदर मोर्चात सहभागी झालेल्या उमाकांत लांडगे लोहारा, रंजना हासुरे हराळी, दगडू तिगाडे, लोहारा.गणेश सोनटक्के जळकोट, प्रकाश घोडके माकणी, तानाजी गायकवाड लोहारा खुर्द, आशिष पाटील वाशी, विष्णू वाघमारे सास्तुर, तिम्मा माने कास्ती खुर्द, या सामाजिक कार्यकर्त्यावर लोहारा पोलीस प्रशासनाने आकस बुद्धीने मोर्चात सहभागी झालेल्या सामाजिक कार्यकर्त्यांवर भा दं सं कलम 188, 269, सह महाराष्ट्र covid-19 उपाय योजना नियम 19 सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) अन्वये सरकारतर्फे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण  उस्मानाबाद covid-19 संसर्गाचे अनुषंगाने विविध मनाई आदेश जिल्हाभरामध्ये लागू करण्यात आले असताना ते  मनाई आदेश झुगारून दि. 17 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता राज्यमंत्री संजय बनसोडे,  खा. शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री  उद्धव  ठाकरे यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा संपन्न झाला. यावेळी त्यांनी ठीक ठिकाणी सभा घेतल्या गावागावात माणसे व त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा करून  जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केलेले आहे.  तरी आपण राज्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यात असा भेदभाव न करता  राज्यमंत्री संजय बनसोड,  खा. शरद  पवार,   मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व गर्दी जमा करण्यासाठी त्यांच्यासमवेत असणाऱ्या सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी वर देखील याचं कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष अॅड. तानाजी चौधरी, आशिष पाटील, दिनकर पाटील, संदीप लाकाळ, आदित्य देशमुख, शिवदास पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.