उस्मानाबाद : कळंब मतदारसंघातील नविन कामासाठी 12 कोटी 17 लाख रुपयाचा निधी मंजूर 

 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद : कळंब मतदारसंघातील नविन कामासाठी 12 कोटी 17 लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे, दूरुस्तीच्या कामासाठी दोन कोटी 79 लाख रुपयाची तरतुद करण्यात आल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे. 

मतदारसंघाच्या विकासासाठी वेगवेगळ्या माध्यमातुन निधीची मागणी करण्यात येत आहे.त्याची दखल घेत महाविकास आघाडीच्या सरकारकडुन निधी मंजुर करण्यात आला आहे. नवीन कामासाठी कळंब तालुक्यात 11 कोटी चार लाख तर मतदारसंघातील उस्मानाबाद तालुक्यातील गावासाठी एक कोटी 12 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे. तसेच दूरुस्तीच्या कामासाठी उस्मानाबाद तालुक्यातील गावासाठी एक कोटी एक लाख रुपये व कळंब तालुक्यातील गावांसाठी एक कोटी 77 लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे.

 नवीन कामामध्ये कळंब तालुक्यातील मोहा गेटेड चेकडॅम क्रमांक गेटेड चेकडॅम एक व दोन, मंगरुळ गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, शेळका धानोरा गेटेड चेकडॅम क्रमांक एक, सैौंदना ढोकी गेटेड चेकडॅम क्रमाक एक, भाटशिरपुरा गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, देवधानोरा गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, बोरवंटी गेटेड चेकडॅम क्रमांक एक, वाटवडा गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, नायगाव गेटेड चेकडॅम क्रमांक एक,दोन, तीन व चार, खामसवाडी गेटेड चेकडॅम क्रमांक एक, दोन व तीन आथर्डी गेटेड चेकडॅम क्रमांक एक, भाटसांगवी गेटेड चेकडॅम क्रमांक एक व दोन, ईटकुर गेटेड चेकडॅम क्रमांक एक ते चार, खडकी क्रमांक एक, सात्रा क्रमांक एक, वाकडी क्रमांक एक, बोरगाव धनेश्वरी गेटेड चेकडॅम क्रमांक एक या गावातील कामाचा समावेश आहे. तर उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडा गेटेड चेकडॅम क्रमांक एक,दुधगाव गेटेड चेकडॅम क्रमांक एक, तडवळा गेटेड चेकडॅम क्रमांक एक या कामांचा समावेश करण्यात आला आहे. 

दूरुस्तीच्या कामामध्ये कळंब तालुक्यातील आढाळा पाझर तलाव, ईटकुर पाझर तलाव क्रमांक एक व दोन, ताडगाव पाझर तलाव क्रमांक एक, नायगाव पाझर तलाव क्रमाक एक व दोन, मस्सा (खं)पाझर तलाव क्रमांक सहा, सौंदणा (अंबा) पाझर तलाव, पाडोळी पाझर तलाव क्रमांक एक, वडगाव (नि) पाझर तलाव क्रमांक एक, तीन, चार व पाच तसेच वडगाव (जा)पाझर तलाव क्रमांक चार, बोरगाव (बु)क्रमांक एक व दोन, आवाडशिरपुरा पाझर तलाव, एकुरगा पाझर तलाव, गौरगाव पाझर तलाव क्रमांक पाच, सहा, सात व आठ, पिंपरी पाझर तलाव क्रमांक एक, रांजणी पाझर तलाव क्रमांक चार आदी कामांचा समावेश करण्यात आला आहे.

 उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी पाझर तलाव, पळसप पाझर तलाव क्रमांक पाच व सहा, गोपाळवाडी पाझर तलाव चार व पाच, कुमाळवाडी पाझर तलाव, उस्मानाबाद पाझर तलाव क्रमांक तीन, राघुचीवाडी पाझर तलाव क्रमांक व दोन, येडशी (सुळकी) पाझर तलाव व वाखरवाडी आदी गावातील कामांचा समावेश करण्यात आला आहे. 

या सर्व कामासाठी माजी मंत्री आमदार प्रा. डॉ.तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही पाठपुरावा केला होता. पालकमंत्री तथा जलसंधारणमंत्री यांनी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांच्यासह मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार घाडगे पाटील यांनी आभार व्यक्त केले.