१० हजाराची पॉलिसी घेतली तरच पीक कर्ज मिळेल 

उस्मानाबादच्या एसबीआय बँक व्यवस्थापक विजय कांबळे यांची मुजोरी 
 
शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या एसबीआयच्या व्यवस्थापकाला खासदारांनी खडसावले

 उस्मानाबाद -  उस्मानाबादच्या  स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत शेतकऱ्यांची अडवणूक करून पिळवूणक केली जात आहे. १० हजार रुपयाची  विमा पॉलिसी घ्या तरच पीक कर्ज मंजूर केले जाईल , तसेच विमा पॉलिसी घेणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर फाईल फेकली जात होती. बँक व्यवस्थापक विजय कांबळे यांची ही मुजोरी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मीडियासमोर उघड केली. 


ज्या बँकेकडून शेतकऱ्यांची पिक कर्ज संदर्भात किंवा पॉलिसी घेण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. याची खातरजमा केल्यानंतर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी थेट स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जाऊन संबंधित व्यवस्थापकाला खडसावले आणि या पुढील काळात असा उद्योग करु नका अशी जाहीर तंबी दिली आहे. 

     यासंदर्भात अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद तालुक्यातील धारूर येथील विश्वनाथ पवार आणि तुकाराम कोरे हे शेतकरी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा बस स्टँड जवळ हे पीक कर्ज घेण्यासाठी गेले असता बँक मॅनेजर विजय कांबळेने शेतकरी पीक कर्ज घेत आहेत त्यांना १० हजार २५० रुपये जीवन विमाच्या नावाखाली बंधनकारक करून मिळणाऱ्या पीक कर्जातून कपात करत होते ही माहिती खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना मिळताच त्यांनी याबाबत बँक मॅनेजरशी फोन द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने खासदार थेट जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व शेतकरी यांच्यासह  बँकेत पोहोचले 


खासदार यांनी बँक मॅनेजर यांना विचारणा केली असता, शेतकऱ्यांनी सांगितले की जे शेतकरी जीवन विमा साठी पैसे देत नाहीत त्या शेतकऱ्यांच्या तोंडावर चक्क पीक कर्जाची फाईल फेकून दिली जाते यानंतर खासदार यांनी जिल्हा उपनिबंधकांना सूचना केल्या की बँकेच्या माध्यमातून जेवढे पीक कर्ज वाटप झाले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांची जीवन विम्याची कपात करण्यात आली आहे त्या सर्वांचा जबाब नोंदवून घेऊन त्यांच्या मर्जीप्रमाणे कपात केली आहे का ? त्यांची अडवणूक करून जीवन विमा चे पैसे दिले तरच पिक कर्ज देण्यात येईल ?याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे सांगितले. 

  ज्याप्रमाणे शेतकरी बँकेकडे कर्ज मागण्यासाठी जातो शेतकरी कर्ज घेऊन भरतो म्हणून बँक चालते सरकारने पगारी देऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बसवलेले आहे व कर्ज मिळावे पतपुरवठा व्हावा हा त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे. 

  उच्च न्यायालयाने  स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यावर ताशेरे ओढले असून निरीक्षण नोंदवून येणाऱ्या ग्राहकाला व्यवस्थित वागणूक देत नाहीत. असा शेरा असताना त्याची अनुभूती येथे आल्याचे त्यांनी सांगितले कोणत्याही राष्ट्रीय बँकेत जर अशाप्रकारे शेतकऱ्यांचे जीवन विमा साठी किंवा इतर काढण्यासाठी कपात करत असतील तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहे.