८ जून रोजी ४५ वर्षाच्या पुढील नागरीकांना मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस 

 

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील रोजी ४५ वर्षाच्या वरील नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ८ जून रोजी १ नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय ४, उपजिल्हा रुग्णालय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद आणि पोलिस रुग्णालय उस्मानाबाद या ठिकाणी कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे 


  लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड सोबत बाळगावे या दिवशी केवळ ४५ वर्षावरील नागरिकांना तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.

आज लसीकरण करण्यात येणाऱ्या केंद्राचे नावे पुढील प्रमाणे - नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रामनगर उस्मानाबाद, पोलिस रुग्णालय उस्मानाबाद, ग्रामीण रुग्णालय मुरूम, ग्रामीण रुग्णालय लोहारा, ग्रामीण रुग्णालय सास्तूर, ग्रामीण रुग्णालय तेर, ग्रामीण रुग्णालय वाशी, ग्रामीण रुग्णालय भूम, उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उपजिल्हा रुग्णालय कळंब, उपजिल्हा रुग्णालय परंडा, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद या १३ लसीकरण केंद्रावर प्रत्येकी २०० दोषींची डोस उपलब्ध करून देण्यात आले असून या डोसची संख्या २ हजार ६०० आहे.

लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून लाभार्थ्यांना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी अथवा बुकिंग करण्याची आवश्यकता नाही. तसेच लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित लाभार्थ्यांपैकी प्रथम आलेल्या लाभार्थ्यांना ऑनस्पॉट नोंदणी पद्धतीने लसीकरण केले जाणार आहे. तर लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकन वाटप करण्यात येणार आहेत. 

 लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणामध्ये मदत करावी. तर उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ एच.व्ही. वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.