उस्मानाबाद जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून नवीन मतदार नोंदणी कार्यक्रम

 

उस्मानाबाद -  जिल्ह्यात एक नोव्हेंबर 2021 पासून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिल्ली येथील भारत निडणूक आयोग आणि मुंबई येथील मुख्य निवडणूक अधिकारी  यांनी दि.एक जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्तं पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे . त्यामुळे एक नोव्हेंबर 2021 पासून जिल्ह्यात नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे त्याअनुषंगाने दि. एक जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी दि.01 नोव्हेंबर,2021 (सोमवार) रोजी प्रसिध्दी करण्यात येईल. दावे आणि  हरकती स्वीकारण्याचा कालावधी सोमवार दि.एक  ते मंगळवार दि.30 नोव्हेंबर,2021 असेल.  विशेष  कालावधी शनिवार, दि.13 आणि   रविवार  दि.14 नोव्हेंबर,2021 असेल. शनिवार, दि.27 आणि  रविवार, 28 नोव्हेंबर, 2021 रोजी  दावे तसेच  हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. सोमवार,दि. 20 डिसेंबर 2021  पर्यंत मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे .  

      त्याअनुषंगाने दि.एक जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणा-या तरुण पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना सहा चा अर्ज (सोबत आवश्यक कागदपत्रासह ) आणि  ज्या मतदारांचे मतदार यादीमधील नाव, पत्ता किंवा  इतर दुरुस्ती असल्यास नमुना आठ चा अर्ज भरुन सहायक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय तथा तहसील कार्यालयात  किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पुराव्यासह जमा करण्याचे आवाहन येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर  यांनी केले आहे. 

             तसेच ग्राम विकास विभागाच्या शासन परित्रक दि.25 ऑक्टोबर 2021 प्रमाणे  मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी तसेच नवीन नोंदणी इत्यादी प्रकीया गावातील नागरिकांपर्यत सुलभतेने पोहोचण्याकरिता  दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही  श्री . दिवेगावकर यांनी कळविले आहे.