मराठा आरक्षण : उद्या निघणार तुळजापूर ते मुंबई वनवास यात्रा

 

तुळजापूर - मराठा समाजाचा  ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी उद्या ६ मे पासून तुळजापूर ते मुंबई पायी वनवास यात्रा निघणार आहे. तुळजापूर ते मुंबई ५०० किलोमीटर अंतर असून,उन्हाळ्याचा विचार करता, ही वनवास यात्रा पहाटे ५ ते सकाळी १० पर्यंत आणि संध्याकाळी ०५ ते रात्री ०८ या वेळेत चालणार आहे. 

अशी निघणार वनवास यात्रा 

चळवळीतील अग्रगण्य शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पहाडी आवाजात जंगी पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. सकाळी ०९ वाजता तुळजाभवानी मातेच्या मंदिरासमोर पोवाड्यांचा कार्यक्रम होईल. 

अनेक गावांतील भजनी मंडळे, हलगी पथक, संभळ वादक, वासुदेव, ढोल पथक देखील सर्व आम्हाला सोडण्यासाठी येणार आहेत. वनवासाला निघालेल्या लोकांना पाठवण्याची ती सुद्धा एक पद्धत आहे. ज्या प्रमाणे प्रभू श्रीराम वनवासाला निघाल्या नंतर त्यांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने अयोध्या वासिय उपस्थित होते. अगदी त्याच प्रमाणे मराठा समाजातील वनवासाला निघालेल्या मराठा समाजातील तरुणांना सोडण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाज उपस्थित राहील. 

वाटेत देखील प्रत्येक गावातील लोक आमच्या राहण्याची जेवणाची सोय करत आहेत. जागोजागी जनजागृती करत ही वनवास यात्रा मुंबई पर्यंत पोचेल. उन्हाळ्याचा विचार करता, ही वनवास यात्रा पहाटे ०५ ते सकाळी १० पर्यंत आणि संध्याकाळी ०५ ते रात्री ०८ या वेळेत चालणार आहे. सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत आराम केला जाईल.