महाराष्ट्र बंदला उस्मानाबादेत संमिश्र प्रतिसाद 

 

उस्मानाबाद - उत्तर प्रदेशातील लखीमपुर-खीरी या ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ  महाविकास आघाडी सरकारने आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्याला उस्मानाबादेत संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

   शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस,शेकाप व मित्र पक्षाच्या वतीने पक्षाच्या प्रमुख  नेत्यांकडून उस्मानाबाद शहरात सकाळी ९ वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक, काळा मारुती चौक ,नेहरू चौक, देशपांडे स्टॅन्ड,खाजा नगर, बार्शी नाका, समता कॉलनी परिसरात फिरून बंदचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला शहरातील सर्वच व्यापार्‍यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला 


   छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र परिवाराच्या वतीने भाजप सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.  यावेळी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेनेचे आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास घाडगे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,  जिल्हा काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने, नगरसेवक खलील सय्यद, राष्ट्रवादीचे मसुद शेख यांनीही आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटार सायकलची रॅली काढून उस्मानाबाद शहरातून बंदचे आवाहन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली.