लोहारा : पाच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक चतुर्भुज 

 

उस्मानाबाद - लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील संत मारोती महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक  मारोती श्रीमंत निकम यांना  मयत शिक्षकाच्या कुटुंबाकडून पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून लोहारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. 

तक्रारदार यांचे  वडिल शिक्षक म्हणून कर्तव्यावर असताना मयत झाले होते. तक्रारदार यांच्या आईच्या नावे फॅमिली पेंशनचा प्रस्ताव संबंधित कार्यालयास पाठवून त्यांचे जि. पी. एफ चा चेक 08/2019 मध्ये व ग्रॅज्युटीचा चेक मागील दोन महिन्यापूर्वी मिळावून दिल्याचे कामाचे बक्षीस म्हणून मारोती श्रीमंत निकम, मुख्याध्यापक, संत मारोती महाराज विद्यालय कानेगाव  यांनी तक्रारदार यांच्याकडे दि.08/01/2021 रोजी  5000/- रुपये लाच रकमेची  मागणी करून  5000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्याने आणि तक्रारदार यांच्या वडिलांचे सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा प्रस्ताव व एकास्मात मृत्यूच्या विम्याचा प्रस्ताव पाठवण्याकरिता 6000/- रुपये लाचेची  मागणी केल्याने  पो स्टे लोहारा, ज़िल्हा. उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांचे  मार्गदर्शनाखाली  गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. उस्मानाबाद यांनी केली.

याकामी त्यांना पोलीस अंमलदार  मधुकर जाधव ,विष्णू बेळे,विशाल डोके ,चालक करडे यांनी मदत केली. कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( कार्यालय क्र. ०२४७२- २२२८७९, मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. उस्मानाबाद (मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397 ) यांनी केले आहे.