कोरोना उपाय योजनांसाठी 'ब्रेक द चेन' अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मार्गदर्शक सूचना
उस्मानाबाद :-जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यात राबवण्यात येत असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊनचा कालावधी राज्य शासनाने 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढवला आहे . याबाबत जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आदेश जरी केले आहेत .
हे आदेशात पुढील प्रमाणे आहेत ----
1. रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW), शनिवार व रविवार जनता कर्फ्यू व फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू :-
a) या आदेशान्वये संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात येत आहे.
b) सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास, जमाव करण्यास मनाई राहील.
c) उर्वरित कालावधीत (म्हणजे सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंतचा कालावधी) वैध कारणांशिवाय अथवा या आदेशात परवानगी दिलेल्या खालील नमूद कारणांशिवाय कोणालाही सार्वजनिक ठिकाणी संचार करण्याची परवानगी असणार नाही. दर शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू राहील.
d) वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवांकरिता होणा-या हालचाली अथवा कार्यांना कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
e) अत्यावश्यक सेवांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल.
i. दवाखाने, रोगनिदान केंद्रे, चिकित्सालये, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, चष्मा दुकाने, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा.
ii. किराणा साहित्याची दुकाने, भाजीपाला, दुध संकलन व वितरण केंद्र, बेकरी, मिठाई, खाद्यपदार्थांची दुकाने(केवळ पार्सल सेवा).
iii. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था – रेल्वे, टॅक्सी, ॲटो व सार्वजनिक बसेस.
iv. विविध देशांच्या राजदूतांच्या कार्यालयांशी संबंधित सेवा.
v. स्थानिक विभागांची/प्राधिकरणांची सर्व मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामे.
vi. स्थानिक विभागांच्या/प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा.
vii. मालवाहतूक
viii. कृषि विषयक सेवा.
ix. ई-वाणिज्य सेवा (E-Commerce)
x. मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे
xi. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्यावश्यक म्हणून निर्देशित केलेल्या सेवा
2. सार्वजनिक ठिकाणची कार्यवाही (Outdoor Activity):-
जिल्ह्यातील सर्व किनारे, बगीचे/उद्याने, सार्वजनिक मैदाने, खेळाची मैदाने, क्रिडांगणे, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, योगा क्लासेस, जिम, व्यायामशाळा, जलतरण तलाव पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
3. दुकाने (Shops), बाजारपेठा (Markets) व मॉल्स (Malls) मध्ये करावयाची कार्यवाही:-
सर्व दुकाने (Shops), बाजारेपठा (Markets) व मॉल्स अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण दिवसभर बंद राहतील. पान, तंबाखू, सिगारेट व तत्सम वस्तूंची विक्री करणा-या पानटप-या पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद राहतील.
a) अत्यावश्यक सेवांच्या दुकानांच्या आवारामध्ये ग्राहकांना सामाजिक अंतराचे पालन करता येण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करुन ती चालू ठेवावीत. सामान घेण्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या ग्राहकांनी सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी आवश्यक त्या खुना (Marking) करण्यात याव्यात.
b) अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानदारांनी व त्याठिकाणी काम करणा-या व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. तसेच खबरदारीच्या उपाययोजना जसे पारदर्शक काचेच्या किंवा इतर भौतिक आच्छादनांच्या आडून ग्राहकांशी संवाद साधणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इ. चा अवलंब करावा.
c) या आदेशान्वये बंद करण्यात आलेल्या दुकानांचे मालकांनी व त्याठिकाणी काम करणा-या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. तसेच खबरदारीच्या उपाययोजना जसे पारदर्शक काचेच्या किंवा इतर भौतिक आच्छादनांच्या आडून ग्राहकांशी संवाद साधणे, इलेक्ट्रॉनिक पेमेंट इ. ची व्यवस्था करणेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी.
d) सर्व आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील.
4. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Public Transport):-
ॲटोरिक्षामध्ये चालक व 2 प्रवासी फक्त, टॅक्सी-चारचाकीमध्ये चालक व परिवहन नियमांनुसार अनुज्ञेय क्षमतेच्या 50 % वाहन क्षमता, बसमध्ये परिवहन विभागाच्या मान्यतेनुसार पूर्ण आसन क्षमतेने प्रवासी वाहतूकीस परवानगी राहील. परंतु प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्यास मनाई राहील.
a) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणा-या सर्व व्यक्तींनी योग्य पद्धतीने मास्क घालणे बंधनकारक राहील. याचे उल्लंघन करणा-या व्यक्तीस रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल.
b) चारचाकी टॅक्सीमध्ये मध्ये जर कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलेला नसेल तर उल्लंघन करणारा व्यक्ती व टॅक्सी चालक यांना प्रत्येकी रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल.
c) प्रत्येक फेरी (Trip) नंतर सर्व वाहनांचे निर्जंतूकीकरण (Sanitization) करण्यात यावे.
d) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये चालक व इतर कर्मचारी जे लोकांच्या संपर्कात येतात त्यांनी लवकरात लवकर भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे आणि लसीकरण पूर्ण होईपर्यंत कोरोना निगेटिव्ह असलेबाबतचे 15 दिवसापर्यंत वैध असलेले प्रमाणपत्र नेहमी सोबत ठेवावे. हा नियम 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल. परंतु टॅक्सी व ॲटोरिक्षांच्या चालकांनी जर स्वत:चे पूर्णपणे पारदर्शक प्लास्टीक शीटच्या आवरणाने विलगीकरण (isolation) केले तर त्यांना या नियमातून वगळण्यात येईल.
e) जर वरिलप्रमाणे नमूद केल्यानुसार जर कोणीही निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन चाचणी प्रमाणपत्र न बाळगता/लसीकरण न करता आढळून आले तर रु. 1000/- इतका दंडा आकारला जाईल.
f) परगावी जाणा-या रेल्वेंच्या बाबतीत रेल्वे व्यवस्थापनाने रेल्वेच्या सर्वसामान्य कक्षामध्ये (General Compartment) प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाहीत व सर्व प्रवाशी मास्क वापरतील याची दक्षता घ्यावी.
g) सर्व रेल्वेंमध्ये मास्क न वापरणा-या कोणत्याही व्यक्तींस रु. 500/- इतका दंड आकारण्यात यावा.
5. कार्यालये (Offices):-
a) खालील नमूद कार्यालये वगळता सर्व खाजगी आस्थापनांची कार्यालये बंद राहतील.
i. सहकारी, खाजगी व PSU बँका, पतसंस्था.
ii. BSE/NSE
iii. विद्युत वितरण विषयक सेवा देणा-या कंपन्या
iv. दूरसंचार सेवा प्रदाते (Telecom Service Providers)
v. विमा/वैद्यकीय विमा कंपन्या (Insurance/Mediclaim Companies)
vi. औषधनिर्मिती कंपन्यांची उत्पादन व वितरण सेवांकरिता गरजेची असलेली कार्यालये
b) शासकीय कार्यालये 50% उपस्थितीमध्ये सुरु राहतील तथापि जी कार्यालये कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या कार्यवाहीकरिता 100% उपस्थितीमध्ये चालू ठेवणे आवश्यक आहे त्या शासकीय विभागांचे/कार्यालयांचे प्रमुख (HOD) यांचे निर्णयानुसार 100% क्षमतेने सुरु राहतील.
c) विद्युत सेवाविषयक सर्व शासकीय कार्यालये व शासकीय कंपन्या, पाणीपुरवठा व बँकींग सेवा व इतर आर्थिक सेवा (financial services) पूर्ण क्षमतेने चालू राहतील.
d) सर्व शासकीय कार्यालये व शासकीय कंपन्यांमध्ये शासकीय कार्यालयाचे आवारामध्ये उपस्थित असलेले कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांचेव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींसोबत घ्यावयाच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात.
e) सर्व शासकीय कार्यालये व शासकीय कंपन्यांमध्ये भेट देण्याची अभ्यागतांना परवानगी असणार नाही. कार्यालयांनी लवकरात लवकर e-visitor प्रणाली सुरु करावी.
f) अतितातडीच्या परिस्थितीमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये येण्याच्या 48 तासांपूर्वीचा निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल असलेल्या अभ्यागतांस कार्यालयामध्ये येण्यासाठी पास देण्याची परवानगी कार्यालयाप्रमुख देऊ शकतील.
g) सर्व खाजगी व शासकीय कार्यालयांमधील व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.
6. खाजगी वाहतूकव्यवस्था (Private Transport):-
खाजगी बसेस व खाजगी वाहने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत चालू
राहतील व इतर कालावधीत (म्हणजे सोमवार ते गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 7 आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंतचा कालावधी) अतितातडीच्या व अत्यावश्यक सेवांकरिता चालू ठेवता येतील.
खाजगी बसेसकरिता खालील बाबींचे पालन करणे आवश्यक राहील.
a) आसनक्षमतेइतक्याच प्रवाशांची वाहतूक करणे. प्रवाशांना उभे राहून प्रवास करण्याची मनाई राहील.
b) खाजगी बसेसमधील सर्व कर्मचा-यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे, सर्व कर्मचा-यांकडे 15 दिवसांपर्यंत वैध असलेल्या निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन चाचणीचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहील. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
7. करमणूक व मनोरंजन (Recreation and Entertainment) क्षेत्र:-
a) चित्रपटगृहे, सिनेमा हॉल्स बंद राहतील.
b) नाट्यगृहे व सभागृहे बंद राहतील.
c) मनोरंजन केंद्रे (Amusement Parks)/Arcades/व्हिडीओ गेम सेंटर्स बंद राहतील.
d) वॉटर पार्क्स (Water Parks) बंद राहतील.
e) क्लब्स, जलतरण तलाव, व्यायामशाळा (Gyms) व स्पोर्ट कॉम्प्लेक्स बंद राहतील.
f) वरिल नमूद आस्थापनांशी संबंधित सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.
g) चित्रपट/मालिका/जाहिराती यांचे चित्रीकरणास खालील नियमांनुसार परवानगी राहील.
i. जास्त संख्येने कलाकारांच्या उपस्थितीमध्ये चित्रीकरण करण्यात येऊ नये.
ii. चित्रीकरणाशी संबंधित सर्व व्यक्ती व कलाकारांनी 15 दिवसांपर्यंत वैध असलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
8. रेस्टॉरंट्स, बार, हॉटेल यांनी करावयाची कार्यवाही:-
a) निवासी सेवा असलेल्या हॉटेलच्या आवारामध्ये असलेले व हॉटेलमधील एक भाग असलेले रेस्टॉरंट्स व बार वगळता उर्वरित सर्व रेस्टॉरंट्स व बार बंद राहतील.
b) सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये पार्सल, ऑर्डर दिलेले पदार्थ घेऊन जाणे (Take away orders) व घरपोच सेवा (Home delivery) देण्यास परवानगी राहील.
c) निवासी सेवा असलेल्या हॉटेल्समध्ये असलेले रेस्टॉरंट्स व बार हॉटेलमध्ये निवासाकरिता असलेल्या अतिथिंकरिताच चालू ठेवता येतील. हॉटेलमध्ये निवासाकरिता नसलेल्या व्यक्तींकरिता वरिल मुद्दा क्र. (8)(b) प्रमाणे कार्यवाही करावी.
d) घरपोच सेवे (Home delivery) च्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. तथापि लसीकरण केलेले नसल्यास त्या व्यक्तीने 15 दिवसापर्यंत वैध असलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन अहवाल सोबत ठेवणे आवश्यक राहील. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
e) वरिलप्रमाणे नमूद केल्यानुसार निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन प्रमाणपत्र किंवा लसीकरण केलेले नसल्यास दि. 10 एप्रिल 2021 नंतर उल्लंघन करणा-या व्यक्तीवर रु. 1000/- व उल्लंघन करणा-या आस्थापनेवर रु. 10,000/- इतका
f) दंड आकारण्यात येईल. वारंवार उल्लंघन आढळून आल्यास कोविड-19 जोपर्यंत साथरोग म्हणून अधिसूचित राहील तोपर्यंत संबंधित आस्थापना चालू ठेवण्याची परवानगी (Licenses) रद्द करण्यात येईल.
g) रेस्टॉरंट व बार या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.
9. धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे:-
a) सर्व धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे बंद राहतील.
b) धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे याठिकाणच्या व्यवस्थापनामधील सेवेमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना त्यांची सेवा (साफसफाई, नित्य पूजा, दिवाबत्ती, इ.) नेहमीप्रमाणे बजावता येईल. तथापि भाविकांना धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे याठिकाणी प्रवेशाची परवानगी असणार नाही.
c) धार्मिक स्थळे/प्रार्थनास्थळे याठिकाणच्या व्यवस्थापनामधील सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.
10. केशकर्तनालये/स्पा/सलून/ब्युटी पार्लर्स:-
a) केशकर्तनालये/स्पा/सलून/ब्युटी पार्लर्स बंद राहतील.
b) या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे.
11. वर्तमानपत्रे (Newspapers):-
a) वर्तमानपत्रांची छपाई व वितरण करता येईल.
b) सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेमध्ये घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील.
c) याठिकाणी काम करणारे सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. घरपोच सेवा पुरविणा-या सर्व व्यक्तींनी 15 दिवसांपर्यंत वैध असलेले निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन चाचणी प्रमाणपत्र सोबत ठेवावे. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
12. शाळा व महाविद्यालये:-
a) शाळा व महाविद्यालये बंद राहतील. तथापि वैद्यकीय व निमवैद्यकीय (Medical & Paramedical) अभ्यासक्रमाची महाविद्यालये, नर्सिंग कॉलेजेस (सरकारी, खाजगी सर्व) ही अत्यावश्यक वैद्यकीय सेवा यामध्ये येत असल्याने ती चालू राहतील.
b) इयत्ता 10 व इयत्ता 12 वी च्या परीक्षा घेण्यास परवानगी राहील. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित सर्व कर्मचा-यांनी लसीकरण केलेले असणे किंवा 48 तासापर्यंत वैध असलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन अहवाल असणे बंधनकारक आहे.
c) दि. 11 एप्रिल 2021 रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तसेच शासनाच्या पूर्वपरवानगीने होणा-या विद्यापीठाच्या व इतर परीक्षा घेण्यास व त्यासाठी प्रवेशपत्र दाखवून परीक्षेसाठी जाण्यास परवानगी राहील.
d) सर्व प्रकारच्या खाजगी शिकवण्या, कोचिंग क्लासेस बंद राहतील.
e) या आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे जेणेकरुन या आस्थापना तात्काळ पुन्हा चालू करता येतील.
13. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, सभा, संमेलने:-
a) सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे, सभा, संमेलने यांना मनाई राहील.
b) मंगल कार्यालये, लॉन्स, फंक्शन हॉल्स बंद राहतील.
c) लग्न, विवाह समारंभामध्ये जास्तीत जास्त 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
d) अंत्यविधी, अंत्ययात्रांमध्ये जास्तीत जास्त 20 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
14. रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री करणारे विक्रेते:-
a) रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची, चहा, ज्युस इ. पेयांची विक्री करणा-या विक्रेत्यांना विक्रीच्या ठिकाणी व्यक्तींना खाद्यपदार्थ/पेये खाण्यासाठी/पिण्यासाठी देण्यास परवानगी असणार नाही. केवळ पार्सल किंवा घरपोच सेवा देता येईल.
b) प्रतिक्षेमध्ये असलेल्या ग्राहकांनी काउंटर पासून पुरेसे सामाजिक अंतर ठेवून थांबावे.
c) याचे उल्लंघन केल्यास साथरोग संपेपर्यंत संबंधित विक्रेत्याचे दुकान बंद करण्यात येईल.
d) या बाबींशी संबंधित सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. लसीकरण होईपर्यंत 15 दिवस वैध असलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन अहवाल सोबत बाळगावा. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल. तथापि स्थानिक प्राधिकरणास (उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander) असे वाटेल की या विक्रेत्यांचे वर्तनामध्ये शिस्त आहे तर हा नियम लागू होण्याचा कालावधी संबंधित स्थानिक प्राधिकरणास (उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander) दि. 10 एप्रिल 2021 च्या पुढे वाढविता येईल.
e) स्थानिक प्राधिकरण (इन्सीडेंट कमांडर, न.प./न.पा./न.पं./ग्रा.पं.) याठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे व्यक्तींची नियुक्ती करावी/CCTV बसवावेत. कोणतेही विक्रेते किंवा ग्राहक बेशिस्तपणे वर्तन करीत कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून आल्यास त्यांना दंड करावा.
f) तथापि स्थानिक प्राधिकरणास (उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander) असे वाटेल की या प्रकारचे उल्लंघन वारंवार होत असून ते रोखण्यासाठी वारंवार दंड आकारणी करणे शक्य नाही अशा वेळी ते संबंधित ठिकाण तात्पुरत्या कालावधीसाठी किंवा साथरोग संपेपर्यंत बंद करण्याचा आदेश देऊ शकतील.
15. उत्पादन क्षेत्र (Manufacturing Sector):-
a) उत्पादन क्षेत्र खालील अटी व शर्तींनुसार सुरु राहील.
b) कारखाने व उत्पादन क्षेत्रांनी कामगारांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांचे शरीराचे तापमान थर्मल स्कॅनरद्वारे तपासावे.
c) उत्पादन क्षेत्रातील सर्व कर्मचा-यांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे. (यामध्ये कोणालाही सूट असणार नाही)
d) जर एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळला तर त्या कामगाराचे संपर्कात आलेल्या इतर कामगारांना त्यांचे स्वखर्चावर विलगीकरण (Quarantine) करण्यात यावे.
e) कारखाने/उत्पादन क्षेत्र ज्याठिकाणी 500 पेक्षा जास्त कामगार काम करतात त्यांनी स्वत:चे विलगीकरण केंद्र (Quarantine facilities) स्थापन करावे.
f) एखादा कामगार पॉझिटिव्ह आढळल्यास पूर्ण जागेचे निर्जंतूकीकरण होईपर्यंत युनिट बंद करण्यात यावे.
g) गर्दी टाळण्यासाठी जेवण व चहाच्या वेळांचे योग्य व्यवस्थापन करावे. एकत्रित येऊन जेवण करण्यास परवानगी देऊ नये.
h) सार्वजनिक प्रसाधनगृहांचे वारंवार निर्जंतूकीकरण करण्यात यावे.
i) सर्व कामगारांनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे व लसीकरण होईपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असलेले निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन प्रमाणपत्र सोबत बाळगावे. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
j) एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी व या कारणामुळे त्याच्या अनुपस्थितीकरिता त्याला सेवेतून काढू नये. जर तो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला नसता तर त्याने जे लाभ प्राप्त केले असते ते सर्व लाभ त्याला देण्यात यावेत.
16. ऑक्सीजन उत्पादक:-
a) ज्या औद्योगिक प्रक्रियेमध्ये ऑक्सीजनचा कच्चा माल म्हणून उपयोग करण्यात येतो त्या प्रक्रियेस दि. 10 एप्रिल 2021 पासून पुढे मनाई राहील. ज्यांना या प्रक्रियेस चालू ठेवायचे आहे त्या संबंधित उद्योगाने संबंधित परवानगी देणा-या प्राधिकरणाकडे (Licensing authority) जाऊन ती प्रक्रिया चालू ठेवण्यासाठीची विशेष कारणे नमूद करावी लागतील. संबंधित परवानगी देणा-या प्राधिकरणाने
b) (Licensing authority) या आस्थापना दि. 10 एप्रिल 2021 पासून बंद राहतील किंवा स्पष्ट परवानगी घेऊन चालू राहतील याबाबत खात्री करावी.
c) सर्व ऑक्सीजन उत्पादन करणा-या उत्पादकांनी त्यांचेकडील (प्रत्यक्ष व उत्पादनक्षमता दोन्हीच्या) 80 % ऑक्सीजनचा साठा वैद्यकीय व औषधी उत्पादनांकरिता राखीव ठेवावा. त्यांनी त्यांचे ग्राहकांची यादी जाहीर करावी.
17. ई-व्यापार (E-Commerce):-
a) ई-व्यापार प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे व लसीकरण होईपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असलेले निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन प्रमाणपत्र सोबत बाळगावे. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
b) याचे वारंवार उल्लंघन आढळून आल्यास संबंधित संस्था चालू ठेवण्याची परवानगी (License) कोविड-19 साथरोग अधिसूचित असेपर्यंतच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल.
18. सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies):-
a) ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये 5 पेक्षा जास्त सक्रीय कोरोना रुग्ण असतील त्या ठिकाणास लघू प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) करण्यात येईल.
b) या संस्थांनी त्यांचे प्रवेशद्वारासमोर/इमारतीबाहेर भेट देणा-या व्यक्तींच्या माहितीकरिता तसा सूचनाफलक लावावा व इमारतीमध्ये कोणत्याही व्यक्तींना प्रवेश करण्याची परवानगी देऊ नये.
c) लघू प्रतिबंधित क्षेत्रासाठीचे सर्व प्रतिबंध जसे आत प्रवेश करणे व बाहेर जाण्याची मनाई इ. वर गृहनिर्माण संस्थेच्या व्यवस्थापनाने पर्यवेक्षण करावे.
d) याबाबत हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्यास अथवा उल्लंघन आढळून आल्यास गृहनिर्माण संस्थेस प्रथम वेळी रु. 10,000/- इतका दंड आकारण्यात येईल. त्यानंतर स्थानिक प्राधिकरणाने निश्चित केल्यानुसार जास्तीचा दंड आकारण्यात येईल. ही दंडाची रक्कम गृहनिर्माण संस्थेमध्ये प्रमाणित कार्यपद्धतीच्या (SOP) अंमलबजावणीकरिता पर्यवेक्षकांची (Supervising personnel) नियुक्ती करण्यासाठी उपयोग केला जाईल.
e) सर्व सहकारी गृह निर्माण संस्थांनी इमारतीमध्ये नियमितपणे येणा-या व्यक्तींनी त्यांचे भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार लसीकरण (Vaccination)f) होईपर्यंत त्यांची आरटीपीसीआर/अँटीजेन चाचणी केली असलेबाबत खात्री करावी.
19. बांधकाम क्षेत्र (Construction Activity):-
a) ज्या ठिकाणी कामगारांना निवासाची सोय उपलब्ध आहे अशा ठिकाणच्या बांधकाम क्षेत्रास (Construction site) परवानगी राहील. साहित्याची ने-आण करण्याकरिता होणारी हालचाल (material movements) वगळता बांधकाम क्षेत्राचे ठिकाणी व त्याठिकाणाहून बाहेर होणारी हालचाल कठोरपणे टाळण्यात यावी.
b) या प्रक्रियेमध्ये सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींनी भारत सरकारने निश्चित केलेल्या नियमांनुसार तात्काळ लसीकरण (Vaccination) करुन घ्यावे व लसीकरण होईपर्यंत 15 दिवसापर्यंत वैध असलेले निगेटिव्ह आरटीपीसीआर/अँटीजेन प्रमाणपत्र सोबत बाळगावे. हा नियम दि. 10 एप्रिल 2021 पासून लागू होईल.
c) याबाबत हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून आल्यास अथवा उल्लंघन आढळून आल्यास बांधकाम क्षेत्राचे विकसकास (developer of the construction site) रु. 10,000/- इतका दंड आकारण्यात येईल तसेच वारंवार उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधित बांधकाम क्षेत्र (construction site) कोविड-19 साथरोग म्हणून अधिसूचित असेपर्यंत बंद करण्यात येईल.
d) एखादा कर्मचारी/कामगार पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी व या कारणामुळे त्याच्या अनुपस्थितीकरिता त्याला सेवेतून काढू नये. जर तो कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आला नसता तर त्याने जे लाभ प्राप्त केले असते ते सर्व लाभ त्याला देण्यात यावेत.
20. पेट्रोल पंप:-
रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW) तसेच दर शनिवार व रविवारी असणारा जनता कर्फ्यू दिवशी अत्यावश्यक बाबींचे अनुषंगाने उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7) चालू राहील. तसेच नगर परिषद/नगर पालिका/नगर पंचायतींच्या हद्दींबाहेरील क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांचे लगत असणारे पेट्रोल पंप दररोज 24 तास (24×7) चालू राहतील. परंतु नगर परिषद/नगर पालिका/नगर पंचायतींच्या हद्दींमध्ये असणा-या पेट्रोल पंपांकरिता रात्रीची संचारबंदी (NIGHT CURFEW) तसेच दर रविवारी जनता कर्फ्यूचे पालन करणे अनिवार्य राहील.
21. दंडात्मक तरतूदी:-
a) या कार्यालयाचे आदेश दि. 28 मार्च 2021 मध्ये नमूद उल्लंघनाबाबत करण्यत आलेल्या दंडात्मक (Fine) तरतूदी तसेच या आदेशामध्ये नमूद दंडात्मक (Fine) तरतूदी एकत्रितरित्या चालू राहतील. तसेच असे उल्लंघन करणा-या आस्थापना 7 ते 14 दिवस सिल करण्याचा अधिकार हे कार्यालय तसेच Incident Commander यांना राहील.
b) सर्व प्रकारच्या आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम कोविड-19 या आपत्तीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन व उपचारासाठी वापर करण्याकरिता संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे जमा करण्यात येईल.
c) सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.
सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 05/04/2021 रोजी रात्री 08.00 पासून तात्काळ लागू करण्यात येत असून सदर आदेश दि. 30 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत लागू राहील. तसेच या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लागू राहतील.