लहू शिंदे यांचे धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू
धाराशिव - वानेवाडी येथील संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मिक आश्रमशाळेत राहणाऱ्या प्रेम शिंदे या विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी न्याय द्यावा म्हणून वडील लहू शिंदे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ( गुरुवार ) पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे .
प्रेम शिंदे यांच्या मारेकऱ्यांना कलम 302 लावून तात्काळ अटक करावी, वानेवाडी येथील संत नारायण बाबा रामजी बाबा अध्यात्मिक संस्थेची आश्रमशाळा अनधिकृत असल्याने ती बंद करावी, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा, आरोपींना सहकार्य करणाऱ्या अन्य लोकांविरुद्ध कडक कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी मयत प्रेम शिंदे याचे वडील लहू शिंदे यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ( गुरुवार ) पासून आमरण उपोषण सुरू केलं आहे .
वाखरवाडी येथील लहू शिंदे यांचा मुलगा प्रेम शिंदे हा वानेवाडी येथील काका उंबरे यांच्या आश्रमशाळेत अध्यात्मिक शिक्षण घेत संत ढोराळा येथील संत गोरोबा काका शाळेत दहावीत शिकत होता, त्याचा ४ ते ५ ऑगस्ट दरम्यान वानेवाडी येथे संशयास्पद मृत्यू झाला असून, याप्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रेम शिंदे यांच्या अंगावर २५ ते ३० मारहाणीच्या जखमा असून, आश्रमातील महाराजांनी बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.मराठा समाजातील एका गरीब विद्यार्थ्यांचा बळी घेणाऱ्या आरोपीविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.