कळंब : ढोकी रोड ते परळी बायपास रस्त्याचे काम अर्धवट, कंत्राटदारास नोटीस

 


कळंब  ( विशाल कुंभार ) -  ढोकी रोड  ते परळी बायपास रस्त्याच्या  कामाची मुदत संपून सहा महिने झाले तरी हा रस्ता  पूर्ण न झाल्यामुळे या रस्त्याच्या कामाबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नगर पालिकेने संबंधित कंत्राटदारास नोटीस वाजवली असली तरी कंत्राटदार जुमानत नसल्याने हा रस्ता अर्धवट अवस्थेत पडला आहे.

कळंब येथील ढोकी रोड ते परळी रोड बायपासची ई - निविदा काढण्यात आली होती.१ कोटी २० लाख रुपयांच्या निवेदिचे तीन भाग करण्यात आले आहेत.सदरील निविदा ही १० टक्के वाढीव दराने देण्यात आली आहे.परळी रोड ते ढोकी रोड विकसित आराखडय़ात काम करण्यात येत आहे. तीन टप्प्यामध्ये काम विभागण्यात आले आहे. प्रत्येक टप्प्यांमध्ये १८ मिटर चा रस्त्या करण्यात येणार आहे. पहिला टप्पा ए टू बी चा टप्पा ६४९७६५० रुपये, दुसरा टप्पा बी टू सी  ६५०१२६३ रुपये, तिसरा टप्पा सी टू डी ६२०५४०७ रुपये अशी निविदा मंजूर करण्यात आली आहे.

ढोकी रोड ते परळी रोड या कामाची मुदत एक वर्षाची होती रस्त्यावरून नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे.या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. या निवेदनावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, भाजप चे शहराध्यक्ष संदीप बाविकार, संतोष बारटक्के,आदित्य भालेराव,बाबासाहेब राऊत, फिरोज सय्यद, जावेद सय्यद, यशवंत रितापुरे, अविनाश वाघमारे, विशाल बोराडे, अजित काळे, रोहन कुंभार,सागर रितापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रिंग रोड चे काम चालु नसल्यामुळे सदरील गुत्तेदाराला काम सुरू करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली असुन तात्काळ काम करण्याचे सुचित करण्यात आले आहे.
- सुवर्णा सागर मुंडे (नगराध्यक्षा, न. प. कळंब)
..................

ढोकी रोड ते परळी रोड च्या कामाची मुदत संपली असून संबंधित गुत्तेदार यांना नोटीस देण्यात आली आहे त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करुन घेण्यासाठी न प प्रशासन सतत पाठपुरावा करत आहे.
- ओंकार जोशी (नगरअभियंता न प कळंब)